माहिममधून बेपत्ता झालेली 6 वर्षाची चिमुरडी पोलिसांना सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 06:06 IST2019-05-01T20:30:45+5:302019-05-02T06:06:04+5:30

याप्रकरणी माहिम पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे. 

6-year-old kidnapped from Mahim | माहिममधून बेपत्ता झालेली 6 वर्षाची चिमुरडी पोलिसांना सापडली

माहिममधून बेपत्ता झालेली 6 वर्षाची चिमुरडी पोलिसांना सापडली

ठळक मुद्दे मुलगी न सापडल्यामुळे हे कुटुंब घाबरले आणि त्यांनी त्याच ठिकाणी राहणाऱ्या इतर कुटुंबाकडे मुलीबाबत चौकशी केली.

मुंबई - माहिम दर्गा येथून रात्री झोपलेले असताना एका पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी आणखी एका सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र रात्री उशीरा ही मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं. याप्रकरणी माहिम पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. सध्या या मुलीची पोलीस चौकशी करत आहेत.  

माहिम फाटक येथे मोठ्या प्रमाणात बाबूंच्या टोपल्या बनवणारे कुटुंब वास्त्व्यास आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे हे कुटुंब झोपलेले होते. दरम्यान आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास या कुटुंबापैकी एका कुटुंबातील एक महिला लघुशंकेसाठी बाहेर गेली होती. दरम्यान, ती पुन्हा परतली असता तिच्या शेजारी झोपलेली तिची 6 वर्षाची मुलगी अंथरुणात न दिसल्याने तिने आपल्या पतीला जागे केले आणि दोघांनी पहाटेच्या सुमारास आजूबाजूच्या परिसरात मुलीचा शोध घेतला. मात्र, मुलगी न सापडल्यामुळे हे कुटुंब घाबरले आणि त्यांनी त्याच ठिकाणी राहणाऱ्या इतर कुटुंबाकडे मुलीबाबत चौकशी केली. मात्र ती कुठेच मिळून न आल्यामुळे अखेर मुलीच्या पालकांनी माहिम पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तेथील हॉटेल वेलकम आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेच पोलिसांनी तपासायला सुरुवात केली. मात्र, त्यातूनही कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. अखेर रात्री ती मुलगी पोलिसांनी सापडली. 

Web Title: 6-year-old kidnapped from Mahim