शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

6 वर्षाची चिमुकली शाळेसाठी गेली ती परत आलीच नाही, गोणीत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 20:28 IST

Murder Case : याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला असता तिचा मृतदेह गोणीत आढळून आला.

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घरातून बेपत्ता असलेल्या एका 6 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी शाळेत जाण्यासाठी घरून निघाली होती आणि परत आलीच नाही. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, पण ती सापडली नाही. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला असता तिचा मृतदेह गोणीत आढळून आला.

हे प्रकरण कल्याणपूरच्या दौलतपूर गावचे आहे. फतेहपूरचे एसपी राजेश सिंह यांनी सांगितले की, वडिलांनी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत मुलीचा शोध सुरू केला. बरीच शोधाशोध केल्यानंतर गावातीलच एका घरातून निष्पापाचा मृतदेह सापडला. मुलीचा मृतदेह गोणीत भरलेला होता. डोक्यावर जखमा आढळल्या.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनीही बलात्काराची भीती व्यक्त केली आहे. मात्र, अहवाल आल्यानंतरच याची माहिती समोर येणार आहे. याप्रकरणी तीन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी दुसरीची विद्यार्थिनी होती आणि गावातीलच प्राथमिक शाळेत शिकत होती. मंगळवारी सकाळी 10 वाजता ती शाळेसाठी घरून निघाली. मात्र, घरी परतली नाही. मुलीच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एवढ्या लहान मुलीवर एवढं क्रौर्य कोण करू शकतं, असं कुटुंबीय म्हणत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSchoolशाळाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस