शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला; आरोपी 3 मुलांचा बाप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:03 IST

...अन् आई-वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली चिमुकली...  पीडित चिमुकलीने आरोपीला ओळखलं...

गुजरातच्या राजकोटमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका सहा वर्षांच्या निरागस मुलीचे अपहरण करून एका ३० वर्षीय व्यक्तीने तिच्यावर क्रूर अत्याचार केला. एवढेच नाही, तर तीन मुलांचा बाप असलेल्या या नराधमाने तिच्या प्रायव्हेटपार्टमध्ये लोखंडी रॉडही टाकला. आरोपीचे नाव राम सिंह असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर जखमी चिमुकल्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजकोट जिल्ह्यातील अटकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार ४ डिसेंबर रोजी घडला. मुलीचे आई-वडील शेतकाम करण्यासाठी बाहेर गेले असता, नराधम राम सिंहने संधी साधत चिमुकलीचे अपहरण करत एका निर्जन स्थळी नेले आणि तेथेच तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही, तर त्याने साधारणपणे एक फूट लांबीचा लोखंडी रॉडही त्याच्या गुप्तांगात (प्रायव्हेट पार्ट) टाकला. 

...अन् आई-वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली चिमुकली - काम संपवून जेव्हा तिचे आई-वडील घरी परतले, तेव्हा त्यांना आपली मुलगी दिसली नाही. जेव्हा त्यांनी तिचा शोध घेतला, तेव्हा ती घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. यानंतर त्यांनी तिला तातडीने जवळच्या एका रुग्णालयात दाखल केले. यानंतर, तिला पुढील उपचारांसाठी राजकोटला हलवण्यात आले.

तातडीने १० पोलीस पथके तयार - रुग्णालयाकडून मिळालेल्या सूचनेनंतर, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने १० पथके तयार केली. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच, टेलिकॉम कंपन्यांकडून घटनास्थळ परिसरातील सक्रिय मोबाइल्सचा डेटा मिळवत तपास सुरू केला. 

...अन् पीडित चिमुकलीने आरोपीला ओळखले -राजकोट ग्रामीनचे एसपी विजय सिंह गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी १४० संशयितांची यादी तयार करून त्यांची चौकशी केली. यानंतर, काउंसलर, महिला पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांच्या उपस्थितीत १० संशयितांचे फोटो पीडितेला दाखवण्यात आले, तेव्हा तिने आरोपीला ओळखले.

आरोपी राम सिंह आणि पीडित कुटुंब MPचे - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. पीडित चिमुकली जखमी झाल्यानंतर आणि तिला रक्तस्त्राव होऊ लागल्यानंतर, तो फरार झाला होता. आरोपी राम सिंह मध्य प्रदेशातील अलीराजपूरचा रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून राजकोटमध्ये काम करतो. तो 12 वर्षांची एक मुलगी आणि दो मुलांचा बाप आहे. पीडितेचे कुटुंबही मुळचे मध्य प्रदेशातीलच आहे. शेतीकामासाठी मजूर म्हणून ते राजकोट येथे आले आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात बीएनएसच्या कलम 65 (2) आणि पॉक्सो अॅक्टच्या कलम 5 (I), 5 (M), आणि 6 (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gujarat: 6-Year-Old Brutally Assaulted; Iron Rod Used; Accused Arrested

Web Summary : In Rajkot, Gujarat, a 6-year-old girl was abducted and brutally assaulted. The perpetrator, a father of three, inserted an iron rod into her private parts. Police arrested the accused, Ram Singh, and the victim is hospitalized.
टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणMolestationविनयभंगPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलFarmerशेतकरी