६ वर्षीय मुलीवर ‘डिजिटल बलात्कार’; आई बाहेर गेल्याने साधला डाव, आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 11:48 IST2022-11-02T11:48:23+5:302022-11-02T11:48:45+5:30

एका व्यक्तीला पोलिसांनी कानवानी परिसरात अटक केली.

6-year-old girl 'digitally raped'; The plot was hatched when the mother went out, the accused was arrested Ghaziabad | ६ वर्षीय मुलीवर ‘डिजिटल बलात्कार’; आई बाहेर गेल्याने साधला डाव, आरोपी ताब्यात

६ वर्षीय मुलीवर ‘डिजिटल बलात्कार’; आई बाहेर गेल्याने साधला डाव, आरोपी ताब्यात

गाझियाबाद : घराशेजारी राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीवर “डिजिटल बलात्कार” केल्याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी कानवानी परिसरात अटक केली. मुलीच्या आईने आरोपी अजय ऊर्फ राम नरेश विरुद्ध “डिजिटल बलात्कार” (पुरुषाच्या जननेंद्रियाशिवाय शरीराच्या कोणत्याही भागाचा वापर करून जबरदस्तीने प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे) केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री आपल्या मुलीसोबत हा घटना घडली. आरोपीवर पोलिसांनी लैंगिक अत्याचार तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

असा घडला प्रकार...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याच्या रात्री पीडित मुलगी तिची मोठी बहीण आणि भावासोबत घरी होती, तर तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. अजय हा तरुणीचा शेजारी आहे. शनिवारी रात्री अजयने तेथे येऊन ‘डिजिटल बलात्कार’केला. रविवारी सकाळी महिला घरी आल्यावर मुलांनी तिला मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली. त्याच्या मोठ्या मुलीने हा सगळा प्रकार आईला सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

मध्य प्रदेशात चार वर्षीय मुलीवर अत्याचार

मध्य प्रदेशात खांडवा जिल्ह्यात एका २५ वर्षीय व्यक्तीने चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या मुलीला झाडीमध्ये फेकून दिले. या ठिकाणी ती बेशुद्धावस्थेत दिसून आली. पोलिसांनी मंगळवारी राजकुमार या आरोपीला अटक केली आहे. मुलीला इंदूरमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Web Title: 6-year-old girl 'digitally raped'; The plot was hatched when the mother went out, the accused was arrested Ghaziabad