विद्यार्थिनीला घेऊन 50 वर्षीय शिक्षक फरार; घरातून नेले 30 हजार, दागिने अन् आधारकार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 12:46 PM2023-10-10T12:46:07+5:302023-10-10T12:51:27+5:30

शिक्षक विद्यार्थिनीला पळवून घेऊन गेला आहे. विद्यार्थिनीने तिच्यासोबत रोख रक्कम, दागिने, आधारकार्ड इत्यादीही नेले आहे.

50 year old teacher took away girl student obscene video viral police searching for two months | विद्यार्थिनीला घेऊन 50 वर्षीय शिक्षक फरार; घरातून नेले 30 हजार, दागिने अन् आधारकार्ड

विद्यार्थिनीला घेऊन 50 वर्षीय शिक्षक फरार; घरातून नेले 30 हजार, दागिने अन् आधारकार्ड

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक 50 वर्षीय शिक्षक आपल्या विद्यार्थिनीला घेऊन पळून गेला आहे. विद्यार्थिनी पळून जाताना आपल्यासोबत 30 हजार रुपये कॅश, दागिने आणि कुटुंबातील सदस्यांचं आधारकार्ड घेऊन गेली आहे. शिक्षक त्यांच्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करत असून त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गोंडा ग्रामीण भागातील कोतवाली भागात असलेल्या गावातील हे प्रकरण आहे. जिथे जुलै महिन्यात शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून घेऊन गेला आहे. विद्यार्थिनीने तिच्यासोबत रोख रक्कम, दागिने, आधारकार्ड इत्यादीही नेले आहे. शिक्षकाने आपल्या मुलीला फूस लावून पवून नेल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. त्याने मुलीसोबतचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो गावकऱ्यांना पाठवून व्हायरल केले आहेत. त्यामुळे त्यांची बदनामी होत आहे.

मुलीच्या वडिलांचं म्हणणं आहे की, जवळपास 3 महिने उलटून गेले तरी पोलीस अद्याप मुलीला शोधून काढू शकलेले नाहीत. आम्हाला न्याय हवा आहे. किती दिवस इकडे तिकडे फिरत राहणार? याचदरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. अटकेचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक मुलीचा दूरचा नातेवाईक आहे. त्याचा एक जुना अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो घरी बनवण्यात आला होता. यामध्ये मुलगी आणि आरोपी दिसत आहेत. 50 वर्षीय शिक्षक गावात ट्यूशन घ्यायचा. तो मूळचा बहराइच जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. 

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आमची मुलगी 17 वर्षांची होती. कौशलकडे शिकायला जायची. 24 जुलै रोजी कौशल तिच्यासोबत पळून गेला. एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र कोणतीही सुनावणी झाली नाही. तीन महिने झाले. मुलीने दागिने, 30 हजार रुपये रोख, दागिने आणि 4 आधार कार्डही सोबत नेले आहेत. कौशल आता तिच्यासोबतचे अश्लील फोटो गावकऱ्यांना पाठवत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: 50 year old teacher took away girl student obscene video viral police searching for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.