शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

मुलीला डॉक्टर बनविण्यासाठी 50 लाख गमावले; प्रवेशाच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 09:25 IST

मीरा रोडच्या नया नगर भागातील अफसर व नझीर हे डॉक्टर दाम्पत्य आयशा आणि हुदा या दोन मुलींसह राहतात.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मुलीला नवी मुंबईतील तेरणा वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थापक कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे सांगून मीरा रोडच्या डॉक्टर दाम्पत्याची ५० लाखांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. तसेच पैसे परत मागितले असता दाम्पत्याला धमकी दिल्याप्रकरणी नया नगर पोलिसांनी बुधवारी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

मीरा रोडच्या नया नगर भागातील अफसर व नझीर हे डॉक्टर दाम्पत्य आयशा आणि हुदा या दोन मुलींसह राहतात. आयेशा ही  मुंबईच्या बीएमसी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तर लहान मुलगी हुदा हिने २०१९ मध्ये नीटची परीक्षा दिली होती. तिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी फोन येत होते. जुलै २०१९ मध्ये किरण निचिते याने फोन करून आपण मंत्रालयात बसतो. तुमच्या मुलीचे ॲडमिशन करायचे असेल, तर मंत्रालयात भेटा, असे सांगितले. अफसर भेटण्यासाठी गेल्या असता निचितेने मंत्रालयाजवळील भाजपच्या कार्यालयात त्यांना नेले. तेथे ५ वैद्यकीय महाविद्यालयांची नावे सांगून व्यवस्थापक कोट्यातील ॲडमिशनसाठी ८० लाख ते १ कोटी लागतील, असे सांगितले. 

त्याने ठाण्याच्या अल्पिन डायग्नोस्टिक सेंटर येथे त्यांना बोलावले. तेथेही अफसर व नझीर गेले. तेथे निचितेसह अखिलेश पाल होता. पाल याने तेरणा वैद्यकीय महाविद्यालयासाठी ९५ लाख, पुण्याच्या एमआयएमईआरसाठी ८० लाख व काशीबाई नवले महाविद्यालयासाठी ८५ लाख, नाशिकच्या वसंतराव पवार महाविद्यालयासाठी ९० लाख आणि मुंबईच्या के. जे. सोमय्यासाठी १ कोटी रुपये व्यवस्थापक कोट्यातून ॲडमिशनसाठी भरावे लागतील, अशी दरांची यादीच मांडली. 

अन्सारी दाम्पत्याने तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी ८० लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर रोख व आरटीजीएसद्वारे किरण निचिते, राकेश वर्मा, लव गुप्ता, राजू पाटील, गणेश, नीलेश व कश्यप यांनी अन्सारी दाम्पत्य आणि त्यांच्या नातलगांकडून टप्प्याटप्प्याने ५० लाख रुपये उकळले. ॲडमिशनचा अर्ज भरून घेतला व त्यासाठीचा धनादेशही घेतला. मात्र, ॲडमिशन करून दिली नाही.

धमकीनंतर गाठले पोलिस ठाणेअन्सारी दाम्पत्याने पैसे मागितले असता, तुमची मुलगी सायन रुग्णालयात शिक्षण घेत आहे. तिला बघून घेऊ, अशी धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर दाम्पत्याने थेट पोलिस ठाणे गाठले. आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत. किरण निचिते हा शहापूरच्या वासिंद भागातील राहणारा आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी