पुणे : फायनान्सचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकाच्या नावाने खोटी ओळख सांगून नवी सिमकार्ड घेऊन सायबर चोरट्याने ५० लाख रुपये वेगवेगळ्या २८ बँक खात्यात ट्रान्सफर करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी लोणीकाळभोर येथील ३९ वर्षाच्या व्यावसायिकाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान घडला़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या व्यावसायिकाचे सदाशिव पेठेत कार्यालय आहे़. ते २६ नोव्हेंबरला मुंबईला गेले होते़. त्यावेळी मुंबईत सायंकाळी ७ वाजता त्यांचा फोन अचानक बंद पडला़. त्यामुळे त्यांना कोणाशी संपर्क करता येईना़. मुंबईतून आल्यानंतर त्यांनी आयडिया कंपनीच्या गॅलरीत जाऊन आपला फोन बंद पडल्याचे सांगितल्यावर त्यांना तुमच्या नावावर तर नवीन सीम कार्ड दिले असून ते २६ नोव्हेंबरपासून सुरु आहे़. त्यानंतर ते कार्यालयात आले व त्यांनी कार्यालयातील संगणकावर पाहिले असता त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ५० लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले़ त्यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला़. या व्यावसायिकाच्या नावाची खोटी ओळख धारण करुन बनावट कागदपत्राच्या आधारे चोरट्याने आयडियाचे नवीन सिमकार्ड मिळविले़ ते कंपनीने अॅक्टिव्हेट केल्यावर या व्यावसायिकाकडील जुने सिमकार्ड बंद पडले़. त्यांच्या सीम कार्डवर बँक खाते लिंक असल्याने चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या २८ बँक खात्यात ही रक्कम ट्रान्सफर केली आहे़. सायबर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ही बाब पुढे आले आहे़. खडक पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे अधिक तपास करीत आहेत़.
नवीन सिमकार्डद्वारे व्यावसायिकाची ५० लाखांची फसवणुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 21:07 IST
२८ बँक खात्यात केले पैसे ट्रान्सफर
नवीन सिमकार्डद्वारे व्यावसायिकाची ५० लाखांची फसवणुक
ठळक मुद्देखडक पोलिसांनी फसवणूकीचा केला गुन्हा दाखल