5 कोटी जमा झालेली खाती शाेधली, माथाडी महामंडळ प्रकरण; ८ बनावट धनादेशांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 07:20 IST2021-04-13T01:35:10+5:302021-04-13T07:20:48+5:30

Crime News : मस्जिद बंदर येथे असलेल्या बँक ऑफ बडाेदाच्या बचत खात्यातून यावर्षी ७ जानेवारी ते १२ मार्चदरम्यान बनावट धनादेशद्वारे खात्यातील ५ कोटी ६ लाख इतकी रक्कम अन्य ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आल्याने खळबळ उडाली.

5 crore accounts recovered, Mathadi Corporation case; 8 Use of counterfeit checks | 5 कोटी जमा झालेली खाती शाेधली, माथाडी महामंडळ प्रकरण; ८ बनावट धनादेशांचा वापर

5 कोटी जमा झालेली खाती शाेधली, माथाडी महामंडळ प्रकरण; ८ बनावट धनादेशांचा वापर

मुंबई : माथाडी मंडळाच्या खात्यातून गायब झालेले ५ कोटी रायपूर, छत्तीसगढ़, मध्यप्रदेश येथील खासगी शिक्षण समिती, बांध     काम आणि पुरवठादार कंपनीच्या खात्यात गेल्याचे समोर येत आहे.
सहायक कामगार आयुक्त तसेच रेल्वे गुड्स क्लिअरिंग ॲंड फाॅरवर्डींग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्ड, मुंबई या माथाडी मंडळाचे प्रभारी अध्यक्ष अशोक लक्ष्मण डोके (५३) यांच्या फिर्यादीवरुन पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
मस्जिद बंदर येथे असलेल्या बँक ऑफ बडाेदाच्या बचत खात्यातून यावर्षी ७ जानेवारी ते १२ मार्चदरम्यान बनावट धनादेशद्वारे खात्यातील ५ कोटी ६ लाख इतकी रक्कम अन्य ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आल्याने खळबळ उडाली. यात, ८ बनावट धनादेशांचा वापर करण्यात आला होता. हे पैसे मध्यप्रदेश, छत्तीसगड, रायपूर येथील वेगवगेळ्या खात्यात गेले आहेत. यापैकी, रशीद खान कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ४६ लाख, अरुणोदय शिक्षण समिती, डोंगरगाव - भिलाईच्या खात्यात १ कोटी ३१ लाख ८२ हजार, जय शक्ती कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ६५ लाख २१ हजार, कौशलेंद्र देकाते- बालाघाटच्या खात्यात १ कोटी ९१ लाख ४२ हजार, मे. महर्शी इंटरप्रायजेस जनरल सप्लायर्स, बालाघाट या खात्यात १ लाख ६० हजार हे पैसे गेल्याचे समोर आले आहे.
संबंधित आरोपींनी या मंडळाच्या बचत खात्यामधून पैसे नमूद बंँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच इतर अनेाळखी व्यक्तींशी संगनमत करुन मंडळाचे बनावट धनादेश व स्वाक्षरीद्वारे ५ कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. या बँक खात्याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

असे जमा केले पैसे
- रशीद खान कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ४६ लाख
- अरुणोदय शिक्षण समिती, डोंगरगाव - भिलाईच्या खात्यात १ कोटी ३१ लाख ८२ हजार
- जय शक्ती कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ६५ लाख २१ हजार
- कौशलेंद्र देकाते - बालाघाटच्या खात्यात १ कोटी ९१ लाख ४२ हजार
- मे. महर्शी इंटरप्रायजेस जनरल सप्लायर्स, बालाघाट खात्यात १ लाख ६० हजार जमा झालेल्या समाेर आले आहेत.
 

Web Title: 5 crore accounts recovered, Mathadi Corporation case; 8 Use of counterfeit checks