शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायात गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक; २२ जणांना घातला गंडा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 19:55 IST

लोकांना ६ टक्के कमी व्याजाने पैसे देण्याचे आमिष दाखविले. त्यांना कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देमुंबईतही केली होती अशीच फसवणूक; महाराष्ट्र ठेवीदारांचे रक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल

पुणे : व्यवसायात गुंतवणुक करण्याचा बहाणा करुन तिघांनी २२ जणांना तब्बल ४८ लाख रुपयांना गंडा घालून कंपनी बंद करुन फरार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मनिष शहा, अमित शर्मा आणि दिलीप मोदी (सर्व रा़ एम आय टी, कोथरुड) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे रक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या तिघांपैकी दिलीप मोदी हा सराईत व्हाईट क्रिमिनल असून त्याने अशाच प्रकारे लोकांना गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवून मुंबईत फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.या तिघांनी कर्वे रोडवरील गणेश चेंबरमध्ये सिटी वेंचर बिझ व बालाजी असोएिशयटस या नावाने कंपनी जानेवारी २०२० मध्ये उघडली. लोकांना ६ टक्के कमी व्याजाने पैसे देण्याचे आमिष दाखविले. त्यांना कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याचे आश्वासन दिले. त्याच्या प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतले़ मात्र, त्यांना कर्ज दिलेच नाही. त्यांनी आणखी एक योजना लोकांना सांगून त्यात गुंतवणुक करायला सांगितली. एका कार घेऊन ती कंपनीकडे ठेवायची. तिचे २ लाख रुपये डाऊन पेमेंट भरायचे बाकी पैसे कंपनी भरले व त्यांना महिना ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या भूलथापांना बळी पडून लोकांनी त्यांच्याकडे पैसे भरले. परंतु, कोणालाही कर्ज मिळाले नाही किंवा २ लाख रुपये डाऊन पेंमेंट भरले तरी गाडी काही मिळाली नाही. तसेच महिना ५०हजार रुपयेही मिळाले नाही. त्यामुळे लोकांना त्यांचा संशय येऊ लागला़ तेव्हा ३ मार्च २०२० रोजी त्यांनी ऑफिस बंद करुन ते तिघेही पसार झाले. ऑफिस बंद झाल्यावर त्यांनी लोकांना काही दिवस झुलत ठेवले. दरम्यान, लॉकडाऊन सुरु झाल्याने आता ऑफिस उघडता येणार नाही, अशी वेगवेगळी कारणे देत ते लोकांना आश्वासन देत राहिले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे़. त्यांच्या भूलथापांना आतापर्यंत २२ जण बळी पडल्याचे समोर आले आहे. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोलिसांनी शोध घेतला. परंतु, ते तेथेही सापडले नाहीत. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल झाजुर्ण अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMONEYपैसा