सराईत चोरटा ४८ तासांत पोलिसांच्या हाती, अडीच लाखांची केली होती घरफाेडी; नवघर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 05:57 IST2021-08-15T05:57:04+5:302021-08-15T05:57:17+5:30

Crime News : गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता  त्यात एक संशयित व्यक्ती इमारतीत जाताना व बाहेर पडताना दिसून आली होता.  

In 48 hours, the thief had burglarized the house to the tune of Rs 2.5 lakh; Navghar police action | सराईत चोरटा ४८ तासांत पोलिसांच्या हाती, अडीच लाखांची केली होती घरफाेडी; नवघर पोलिसांची कारवाई

सराईत चोरटा ४८ तासांत पोलिसांच्या हाती, अडीच लाखांची केली होती घरफाेडी; नवघर पोलिसांची कारवाई

मीरा रोड : भाईंदर पूर्वेस नवघर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्याने एका घरातून दागिने, रोख, मोबाइल असा २ लाख ५६ हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी याप्रकरणी सराईत चोरट्यास अटक केली आहे. 
नवघर मार्गावर राहणारे ओम पोतदार यांच्या घरातील सर्व जण कामानिमित्त बाहेर गेले असता एका चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व ३ मोबाइल असा एकूण २ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. पोतदार यांच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
  गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता  त्यात एक संशयित व्यक्ती इमारतीत जाताना व बाहेर पडताना दिसून आली होता.  त्यानुसार संशयित व्यक्तीचा शोध घेतला असता तो नालासोपारा येथे राहत असल्याचे समजले. नवघर पोलिसांनी ४८ तासांच्या आत सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने  गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपीकडून चोरलेला ऐवज हस्तगत करण्यात आला. आरोपीवर विविध ठिकाणी १३  गुन्हे दाखल आहेत, असे सांगितले.

Web Title: In 48 hours, the thief had burglarized the house to the tune of Rs 2.5 lakh; Navghar police action