मोबाईलचे दुकान फोडून साडेचार लाखांचे ४५ मोबाईल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:02 IST2018-12-17T18:01:25+5:302018-12-17T18:02:20+5:30
मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह वेगवेगळया कंपन्यांचे ४५ मोबाईल असा ४ लाख ६७ हजारांचा ऐवज लंपास केला.

मोबाईलचे दुकान फोडून साडेचार लाखांचे ४५ मोबाईल लंपास
पिंपरी : मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह वेगवेगळया कंपन्यांचे ४५ मोबाईल असा ४ लाख ६७ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना दिघीतील परांडेनगर येथे घडली. विशाल प्रकाश पाटील (वय २३, रा. पसायदान सोसायटी, परांडेनगर, दिघी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विशाल पाटील यांची शरयु एंटरप्रायजेस नावाचे मोबाईलचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते शनिवारी मोबाईलचे दुकान बंद करुन घरी गेले. दरम्यान, चोरट्यांनी या दुकानामध्ये ठेवलेली ८ हजारांची रोकड यासह ४५ मोबाईल असा ४ लाख ६७ हजार २१० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.