शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

इंद्राणी मुखर्जीसह ४० महिला कैद्यांना कोरोनाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 06:56 IST

भायखळा कारागृहातील एका महिला कैद्याला ३० मार्च रोजी सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी या महिलेला ताप आल्याने जे.जे. रुग्णालयात दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात असलेल्या इंद्राणी मुखर्जीसह ४० महिला कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कारागृहातील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

भायखळा कारागृहातील एका महिला कैद्याला ३० मार्च रोजी सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी या महिलेला ताप आल्याने जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तिची कोरोना चाचणी करताच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. कारागृहाने तत्काळ कारागृहातील सर्व महिला, पुरुष कैद्यांसह कारागृह कर्मचारी, अधिकाऱ्याची चाचणी केली. त्यात इंद्राणी मुखर्जीसह ४० महिला कैदी पॉझिटिव्ह आल्या आहेत. शुक्रवारी त्यांचा प्राथमिक अहवाल येताच, त्यांना कारागृहाच्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या महिलांना कुठलीही लक्षणे नसल्याचेही कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले.महिला कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याच्या वृत्ताला कारागृह अधीक्षक सदानंद गायकवाड यांनीही दुजोरा दिला आहे. कोरोनाचे संक्रमण नेमके कसे झाले, याबाबत कारागृह प्रशासन अधिक तपास करत आहे. भायखळा महिला कारागृहात २६२ कैद्यांची क्षमता असताना ३६३ महिला कैदी आहेत. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण मिळवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर राज्यभरातील कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत कारागृहातील  ९ कैदी आणि ८ कारागृह कर्मचाऱ्यांचा काेराेनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यभरातील कारागृहात २५९ कैद्यांसह १०४ कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे.

१,६८५ कैद्यांचे लसीकरणमहाराष्ट्रामध्ये एकूण ४३ कारागृह असून त्यात ९ मध्यवर्ती कारागृह, एक महिला, तर २८ जिल्हा कारागृहांचा समावेश आहे. राज्यभरात आतापर्यंत १ हजार ६८५ कैदी आणि ३ हजार १४० कारागृह कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndrani Mukherjeeइंद्राणी मुखर्जी