मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड घेतलं अन् ४० हजार काढून आरोपी फरार; एक चूक महिलेला पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:37 IST2025-07-28T18:29:51+5:302025-07-28T18:37:02+5:30

बिहारमध्ये एटीएममध्ये कार्ड बदलून लोकांना लुटणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे.

40 thousand rupees withdrawn from woman account by changing ATM accused caught in CCTV camera | मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड घेतलं अन् ४० हजार काढून आरोपी फरार; एक चूक महिलेला पडली महागात

मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड घेतलं अन् ४० हजार काढून आरोपी फरार; एक चूक महिलेला पडली महागात

Bihar Crime: एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाणाऱ्याने लुटण्याचा धक्कादायक प्रकार बिहारच्या गयामधून समोर आला आहे. बिहारच्या गया येथील खिजरसराय बाजारात एटीएम फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक करणाऱ्याने एका महिलेचे एटीएम कार्ड बदलले आणि तिच्या खात्यातून पैसे काढले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि व्हिडिओ व्हायरल होतोय. महत्त्वाचे म्हणजे फसवणूक करणाऱ्यानी भीतीपोटी पैसे परत केले. सुरुवातीला महिलेने एफआयआर दाखल करण्यास नकार दिला होता. मात्र पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपीची ओळख पटली असून पोलीस त्याच्या शोध घेत आहेत.

खिजरसराय मार्केटमधील एटीएममध्ये २६ जुलै रोजी दोन तरुणांनी एका महिलेची फसवणूक केली. महिला पैसे काढण्यासाठी पोहोचताच आरोपींनी हुशारीने तिचे एटीएम कार्ड बदलले आणि तिच्या खात्यातून ४० हजार रुपये काढले. या घटनेनंतर खिजरसराय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि एटीएममध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवले. फुटेजमध्ये दोन तरुण महिलेचे एटीएम बदलताना स्पष्टपणे दिसत आहेत. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींची ओळख पटवली आहे आणि त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी काढलेले ४०,००० रुपयेही पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत आणि लवकरच त्यांना अटक केली जाईल.

दुसरीकडे एटीएममध्ये कार्ड बदलून बँक खात्यातून बेकायदेशीरपणे पैसे काढणाऱ्या एका टोळीने बाबूचंद प्रसाद यादव यांनाही लक्ष्य केले होते. आरोपींनी त्यांच्या बँक खात्यातून बेकायदेशीरपणे ४०,००० रुपये काढले. ते डेल्हा बस स्टँडजवळील पीएनबी एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान, मागून एक व्यक्ती आली आणि म्हणाली की काही अडचण असेल तर मला सांगा. त्यांनी त्याला पैसे निघत नसल्याचे सांगितले. यादरम्यान आरोपीने त्ंयाचे एटीएम कार्ड घेतले आणि पैसे काढण्याच्या बहाण्याने कार्ड बदलले. यानंतर, त्या व्यक्तीने त्याच्या एटीएम कार्डद्वारे त्याच्या बँक खात्यातून बेकायदेशीरपणे ४०,००० रुपये काढले.

दरम्यान, या घटनेमुळे एटीएममधून पैसे काढताना काळजी घेणे किती महत्त्वाचे असल्याचे समोर आलं आहे. सर्वसामान्यांना एटीएममध्ये कोणत्याही अज्ञात व्यक्तीची मदत घेऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे.
 

Web Title: 40 thousand rupees withdrawn from woman account by changing ATM accused caught in CCTV camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.