४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 08:56 IST2025-09-15T08:54:48+5:302025-09-15T08:56:13+5:30

जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पार्टीचे आयोजन होते, परंतु न्यूड पार्टी सर्वात वेगळी असते. या पार्टीत सहभागी होणारे विना कपडे नग्न अवस्थेत सहभागी होतात.

40 thousand entry fee, all-night 'Nude Party'; 21 boys and girls were going to come without clothes, Raipur Police arrested 7 organizers | ४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक

४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक

रायपूर - छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे न्यूड पार्टी, स्ट्रेंजर्स हाऊस आणि पूल पार्टी प्रकरणाचा खुलासा झाला आहे. रायपूर येथे ७ आयोजकांनी मिळून न्यूड पार्टीची स्क्रिप्ट लिहिली होती. २१ सप्टेंबरला या पार्टीचे आयोजन होणार असल्याचं सोशल मीडियात प्रचार सुरू होता. त्यात मुलामुलींना विना कपड्याचे यायचे होते. रायपूरमधील या न्यूड पार्टीचे शहरातील युवक युवतींना गुप्तरितीने एन्ट्री पास विकले जात होते. या पार्टीसाठी ४० हजार ते १ लाखापर्यंत एन्ट्री फी ठरवली होती. त्याशिवाय पार्टीत ड्रग्स सेवनही करण्यात येणार होते. 

अटक केलेल्या आरोपींमध्ये हायपर क्लबचे मालक जेम्स बेक, संतोष जेवानी आणि अजय महापात्रा याच्यासह ७ जणांचा समावेश आहे. रायपूर पोलिसांनी या आयोजकांना अटक केली असून त्यातील एक आरोपी मंत्र्‍यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगितले जाते, ज्या मंत्र्याचं नाव अलीकडेच एका भ्रष्टाचारात समोर आले होते. आता या प्रकरणी छत्तीसगड महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी पोलीस अधीक्षक आणि सायबर सेल प्रमुखांना २ दिवसांत घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

काय असते न्यूड पार्टी?

जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पार्टीचे आयोजन होते, परंतु न्यूड पार्टी सर्वात वेगळी असते. या पार्टीत सहभागी होणारे विना कपडे नग्न अवस्थेत सहभागी होतात. यूरोप आणि अमेरिका येथे न्यूडिस्ट बीच आणि रिसोर्ट मोठ्या प्रमाणात आहेत. भारतात कायदेशीर आणि सामाजिक सांस्कृतिक कारणास्तव न्यूड पार्टीला परवानगी नाही. पाश्चात्य देशात असे प्रकार घडले जातात परंतु भारतात अशा पार्टीचे आयोजन करणे आणि त्यात सहभागी होणे गुन्हा असल्याने पोलिसांनी या आयोजकांवर कारवाई केली. 

रायपूरमध्ये काय घडलं?

न्यूड पार्टीचे आयोजक संतोष जेवानी आणि अजय महापात्रा यांनी २१ सप्टेंबरला एसएएस फार्महाऊसमध्ये हा इव्हेंट प्लॅन केला होता. या मुलामुलींना विना कपडे बोलवण्यात आले होते. संतोष गुप्ता फार्म हाऊसचा मालक आहे. त्याने पार्टीसाठी फॉर्म दिले होते. अवनीश गंगवानी याच्याकडे पार्टीचं प्रमोशन करण्याचं काम होते. Whats is Raipur नावाने सुरू असलेल्या पेजवरून तो प्रमोशन करत होता. हायपर क्लब मालक जेम्स बेकने त्याच्या क्लबमध्येही प्रमोशन करण्यास मदत केली. आयोजक अज्ञात इन्स्टाग्राम पेजवरून पोस्टर, व्हिडिओ, प्रमोशनल साहित्य टाकत होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व ठिकाणांवर धाड टाकत आरोपींना अटक केली. १८ वर्षावरील युवक युवतींना पार्टीसाठी आमंत्रित केले होते. पार्टीची वेळ रात्री १ ते सकाळी ६ पर्यंत होती. या आयोजनावर १० लाखांपर्यंत खर्च करण्यात आला होता. 
 

Web Title: 40 thousand entry fee, all-night 'Nude Party'; 21 boys and girls were going to come without clothes, Raipur Police arrested 7 organizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.