अमानुषपणाचा कळस...नोकरीचे आमिष दाखवून ४० पुरुषांनी केला तरुणीवर बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 07:34 PM2018-07-21T19:34:51+5:302018-07-21T19:38:10+5:30

११ ते १२ हजार रुपये महिना पगाराची स्वीपरची नोकरी देण्याचे आमिष दाखवले 

40 men commit rape by a man in the face of inhumanity | अमानुषपणाचा कळस...नोकरीचे आमिष दाखवून ४० पुरुषांनी केला तरुणीवर बलात्कार 

अमानुषपणाचा कळस...नोकरीचे आमिष दाखवून ४० पुरुषांनी केला तरुणीवर बलात्कार 

Next

चंदीगड - भारतात अमानुषपणाचा कळस गाठलेली घटना घडली आहे. या घटनेमुळे हरियाणामध्ये खेद व्यक्त केली जात आहे. ४० पुरुषांनी चार दिवस बलात्कार केल्याची तक्रार एका २२ वर्षीय तरुणीने केली आहे. ही घटना हरयाणामधील पंचकुला जिल्ह्यात मोरनी येथे घडली असून मनीमाजरा पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. 

चंदीगड येथील मनीमाजरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पीडित महिलेने तिला चार दिवस डांबून ठेवण्यात आले होते, तिथे या पुरुषांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला असा आरोप केला आहे. या महिलेच्या पतीने आमच्या एका ओळखीतल्या इसमाने तिला गेस्ट हाऊसमध्ये ११ ते १२ हजार रुपये महिना पगाराची स्वीपरची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. तिला गुंगीचे औषध दिले आणि चार दिवस तिच्यावर बलात्कार केला. घडल्या प्रकाराची कुठे वाच्यता न करण्याची धमकी देखील दिली अशी माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. ही घटना वरिष्ठांना न कळवल्याने तसेच महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून एका महिलेसह दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे. गेस्ट हाऊसच्या मालकाला आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. 


दररोज जवळजवळ  १० पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार १५ ते १८ जुलैपर्यंत सुरू होता. तिने कसाबसा मला चोरून फोन केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. मी गेस्ट हाऊसच्या मॅनेजरशी बोललो. तिला सोडा नाहीतर मी पोलिसांना कळवेन अशी धमकी दिली तेव्हा ती घरी आली आणि घडलेली सर्व हकिकत सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार केली असं महिलेच्या पतीने सांगितलं. 

Web Title: 40 men commit rape by a man in the face of inhumanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.