बोरघाटात टेम्पो पलटी होऊन ४ महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 19:54 IST2021-05-07T19:52:32+5:302021-05-07T19:54:17+5:30
Accident : टेम्पोमध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आपटी या गावातील कदम व घोरपडे कुटुंबातील सदस्य होते.

बोरघाटात टेम्पो पलटी होऊन ४ महिला जखमी
खोपोली - मुबंई पुणे राष्ट्रीय मार्गावर बोरघाटामध्ये शिग्रोंबा मंदिराच्या वरील खिंडीत साताऱ्याहून भिवंडीला चाललेला टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये चार महिला जखमी झाल्या आहेत. टेम्पोमध्ये एकूण सात प्रवासी होते. एक लहान मुलगा सुखरूप आहे. हा अपघात आज सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडला.
टेम्पोमध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आपटी या गावातील कदम व घोरपडे कुटुंबातील सदस्य होते. पदमावती नामदेव घोरपडे, (४५)सातारा, मजुंळा गोविदं कदम (४५) सातारा या दोघी जखमी महिलांवर खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आय आर् बी पेट्रोलिंग तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साटेलकर, सदस्य दिनेश ओसवाल, छगन राठोड, विजय भोसले, भक्ती साठीलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.