शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
4
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
5
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
6
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
8
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
9
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
10
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
11
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
12
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
13
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
14
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
15
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
16
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
17
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
18
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
19
आईसोबत सतत फिरते मग शाळेत जाते कधी? ऐश्वर्याने दिलं ट्रोलर्सला उत्तर
20
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला

बनावट दस्तऐजव तयार करुन फायनान्स कंपनीला ३२ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 8:16 PM

आपल्या मालकीच्या जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर तक्रार दाखल...

ठळक मुद्देयाप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करुन त्या आधारे जमीन खरेदी करण्याचा बहाणा करुन कर्ज घेऊन फायनान्स कंपनीला ३२ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी जमिनीच्या मुळ मालकाने केलेल्या तक्रारीनुसार एका महिलेसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी संतोष पिसाळ (वय ४३, रा.आदर्शनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजी प्रभाकर स्वामी (वय ३८, रा. सोरतापवाडी), अमोल दीपक चौधरी (वय ३२, रा. सोरतापवाडी), अजय गुलाब गायकवाड (वय ३५, रा. कुंजीरवाडी), संजय कचरु पटेकर (वय ४०) व आणखी दोघे अशा ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसाळ यांच्या मालकीची फुरसुंगीत जागा आहे. ही जागा आरोपींनी खोटी कागदपत्रे आणि दस्तऐवज तयार करुन प्रथम कपिल झुंबरलाल सरवदे यांना विकली. त्यानंतर तीच जागा पिसाळ यांच्या जागी दुसरीच व्यक्ती उभी करुन संजय पटेकर यांना विकली. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी आनंद फायनान्स या कंपनीकडून ३२ लाख ६२ हजार रुपयांचे कर्ज घेतले.आपल्या मालकीच्या जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करुन कर्ज घेतल्याचा प्रकार लक्षात आल्यावर पिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप गाडे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस