मुलास गळफास देऊन ३१ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; जळगावमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 09:37 IST2022-06-17T09:11:54+5:302022-06-17T09:37:06+5:30
पूर्वी वसंतराव पाटील असे विवाहितेचे तर वृषांत दीपक पाटील उर्फ बिट्टू असे मुलाचे नाव आहे.

मुलास गळफास देऊन ३१ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; जळगावमधील घटना
अमळनेर जि. जळगाव : तालुक्यातील शिरूड येथील माहेर असलेल्या ३१ वर्षीय विवाहितेने आपल्या पाच वर्षीय मुलास गळफास देऊन स्वत:ही गळफास घेतला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
पूर्वी वसंतराव पाटील असे विवाहितेचे तर वृषांत दीपक पाटील उर्फ बिट्टू असे मुलाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पूर्वी हिने इंग्रजीतून चिट्ठी लिहिली आहे. त्यात आपल्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये, आम्ही दोघे मायलेक जीवन संपवत आहोत. नंदुरबार येथील सासरच्या मंडळीला बोलावू नका, असेही चिट्ठीत लिहिले आहे.