वाढदिवसाच्या दिवशी 27 वर्षीय तरुणाची हत्या; घाटकोपर येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 08:14 IST2019-07-29T08:13:59+5:302019-07-29T08:14:20+5:30

पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

27-year-old man killed on his birthday in Ghatkopar | वाढदिवसाच्या दिवशी 27 वर्षीय तरुणाची हत्या; घाटकोपर येथील घटना 

वाढदिवसाच्या दिवशी 27 वर्षीय तरुणाची हत्या; घाटकोपर येथील घटना 

मुंबई - घाटकोपर परिसरातील 27 वर्षीय तरुणाची 7 ते 8 जणांच्या जमावाने वाढदिवसाच्या दिवशीच हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

या तरुणाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु आहे. त्याचवेळी तिथे आलेल्या टोळक्यांनी तरुणावर वार करत त्याची हत्या केली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. चार पाच दिवसांपूर्वी या तरुणाचं काही जणांसोबत भांडण झालं होतं अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली. 

या मृत तरुणाचं नाव निलेश सावंत असून तो शिवसैनिक होता अशी माहिती मिळत आहे. 
 

Web Title: 27-year-old man killed on his birthday in Ghatkopar