Video : 26/11 Terror Attack : २६/११हल्ल्यातील शहिदांना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 18:21 IST2018-11-26T18:20:48+5:302018-11-26T18:21:27+5:30
पोलीस जिमखाना येथील राज्य सरकारच्या या कार्यक्रमासह मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातही हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी, पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Video : 26/11 Terror Attack : २६/११हल्ल्यातील शहिदांना वाहिली श्रद्धांजली
मुंबई - ‘२६/११’च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना राज्य सरकारच्या वतीने मरिन लाइन्स येथील पोलीस जिमखान्यात सकाळी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालक मंत्री दीपक केसरकर, राज्यपाल विद्यासागर राव, राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच कसाब अंदाधुंद गोळीबार करत जेथून २६/११ दहशतवादी हल्ल्याला सुरुवात केली त्या सीएसएमटी रेल्वे स्थानकात देखील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलीस जिमखाना येथील राज्य सरकारच्या या कार्यक्रमासह मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातही हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी, पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली.