शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

रिक्षामध्ये २५ वर्षीय तरुणीवर गँगरेप; जोरजोरात गाणं वाजवल्याने पीडितेची मदतीची हाक पोहोचली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:20 IST

Gangrape Case : पीडित मुलीने सांगितलेल्या आणि ऑटोवर लिहिलेल्या ‘महाकाल’ नावाच्या मदतीने सर्व आरोपींचा छडा लागला आणि त्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजस्थानच्या धौलपूरमध्ये २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. 12 फेब्रुवारीला दारू पिऊन ऑटोचालक आणि त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ऑटोमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवून अनेकांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडित मुलीने सांगितले. पीडित मुलीने सांगितलेल्या आणि ऑटोवर लिहिलेल्या ‘महाकाल’ नावाच्या मदतीने सर्व आरोपींचा छडा लागला आणि त्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धौलपूरच्या ग्रामीण भागात राहणारी २५ वर्षीय तरुणी भाड्याच्या घरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून १२ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ती डॉ. शहरातील जलकुंभ चौकातून भाजीपाला घेण्यासाठी ऑटोतून जात होती. मुलीने ऑटो चालकाला तिला खाली उतरण्याबाबत सांगितले. परंतु ऑटो चालकाने तिचे ऐकले नाही आणि तिला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर नेले. यादरम्यान मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑटोमधील मोठ्या आवाजामुळे तिचा आवाज बाहेर जाऊ शकला नाही. दरम्यान, ऑटोचालकाने त्याच्या अन्य पाच साथीदारांना फोन करून बोलावले. त्यानंतर सर्वांनी जबरदस्तीने मुलीला दारू पाजली आणि ती बेशुद्ध झाली. जेव्हा तिला शुद्ध आली त्यावेळी ती राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील एका शेतात असल्याचं तिला निदर्शनास आलं. जिथे सर्व आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडवली होती.सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केलीपीडितेने शेतातून निघून चहाच्या दुकानात झालेला त्रास सांगितला, त्यानंतर लगेचच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पीडितेने महिला पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित मुलीची ओळख पटवून व ऑटोवर महाकाल लिहिलेल्या मदतीने सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक प्रवेंद्र महला यांनी सांगितले की, १३ फेब्रुवारी २०२२ रोजी महिला पोलिस ठाण्यात एका महिलेने सामूहिक बलात्काराची तक्रार दिली होती. पीडितेने सांगितले की, १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता कोणीतरी तिला ऑटोमधून नेले आणि काही लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अभय कमांडच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळRajasthanराजस्थान