मीरारोड मधून ८ जुगारींसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 23:47 IST2019-06-23T23:47:34+5:302019-06-23T23:47:52+5:30
मीरारोडच्या शितल नगर मधील स्रेहांजली शोरुम शेजारील गॅरेज मध्ये पत्यांचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांना सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकाने रविवारी रंगेहात अटक केली.

मीरारोड मधून ८ जुगारींसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
मीरारोड - मीरारोडच्या शितल नगर मधील स्रेहांजली शोरुम शेजारील गॅरेज मध्ये पत्यांचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांना सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकाने रविवारी रंगेहात अटक केली. त्यांच्या कडील ६५ हजार रुपयांची रोख, ११ मोबाईल, १ बुलेट व ३ चारचाकी कार असा २५ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुलकर्णी यांना सदर जुगाराच्या आड्याची माहिती मिळाली होती. मीरारोड पोलीस ठाण्यात जुगार बंदी अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन उपनिरीक्षक प्रकाश कांबळे पुढिल तपास करत आहेत. दरम्यान पोलीसांनी आरोपींची नावं देण्यास टाळटाळ चालवली असुन यातील काही जणांची पोलीसां सोबत उठबस असल्याची चर्चा आहे.