5 स्टार हॉटेलच्या लेडीज टॉयलेटमध्ये 15 वर्षीय मुलाने 24 वर्षीय महिलेवर केला रेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:09 IST2022-06-20T17:00:16+5:302022-06-20T17:09:12+5:30
Dehradun Crime News : महिला पश्चिम बंगालची राहणारी आहे. ती विवाहित असून तिला एक मुलगी आहे. छत्तीसगढचा राहणाऱ्या आरोपीला पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर अटक केली आहे.

5 स्टार हॉटेलच्या लेडीज टॉयलेटमध्ये 15 वर्षीय मुलाने 24 वर्षीय महिलेवर केला रेप
Dehradun Crime News : देहरादूनच्या एका पाइव्ह स्टार हॉटेलमध्ये हाउसकिपिंग स्टाफ म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय महिलेसोबत 17 जूनला हॉटेलमध्ये 15 वर्षीय मुलाने कथितपणे बलात्कार केला. ही घटना सकाळी साडे नऊ वाजता पाइव्ह स्टार हॉटेलच्या महिला शौचालयात झाली.
महिला पश्चिम बंगालची राहणारी आहे. ती विवाहित असून तिला एक मुलगी आहे. छत्तीसगढचा राहणाऱ्या आरोपीला पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर अटक केली आहे. पोलिसांनुसार, महिला महिला शौचालयात आपला मोबाइल फोन चार्ज करत होती. तेव्हाच आरोपी शौचालयात आला आणि तिला हाय करून तिच्यासोबत बोलू लागला होता.
महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण त्याने तिच्यासोबत बोलणं सुरूच ठेवलं. मग ती आरोपीला म्हणाली की, स्टाफ पाहुण्यांसोबत बोलत नाही आणि त्याने लगेच महिला शौचालयातून जायला हवं. आरोपीने तिला विरोध करत शौचालयाचा दरवाजा आतून बंद केला आणि तिच्यासोबत बलात्कार केला. तक्रारदार महिलेने सांगितलं की, ती मदतीसाठी ओरडली होती. पण दरवाजा आतून बंद असल्याने कुणीही तिचा आवाज ऐकला नाही.
पोलिसांनी सांगितलं की, अल्पवयीन आरोपी दोन दिवसांपासून परिवारातील सदस्यांसोबत हॉटेलमध्ये राहत होता आणि दुपारी चेक आउट करणार होता. अटक केल्यावर अल्ववयीन आरोपीला न्यायालयात हजर करून शनिवारी त्याला सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
यादरम्यान पाइव्ह स्टार हॉटेलच्या प्रवक्त्याने सांगितलं की, हॉटेलचे अधिकारी या घटनेवर स्थानिक पोलिसांसोबत मिळून काम करत आहेत. आणि आश्वासन दिलं की, पाहुणे आणि स्टाफची सुरक्षा त्यांच्यासाठी महत्वाची आहे.