22-year-old model raped by Mumbai's youth in delhi's five-star hotel; FIR registered | 22 वर्षीय मॉडेलवर फाईव्हस्टार हॉटेलमध्ये बलात्कार; मुंबईच्या तरुणावर FIR दाखल

22 वर्षीय मॉडेलवर फाईव्हस्टार हॉटेलमध्ये बलात्कार; मुंबईच्या तरुणावर FIR दाखल

देशात निर्भया कायद्याची अंमलबजावणी दिल्लीतील बलात्कार प्रकरणामुळे (Nirbhaya Rape Case) झाली होती. आजही दिल्ली महिलांसाठी असुरक्षित असून फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही महिला सुरक्षित नसल्याची घटना घडली आहे. मॉडेल असलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन बलात्काराची तक्रार केली यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Rape on Model girl in Delhi by South mumbai's resident.)


दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात 22 वर्षांच्या तरुणीने बलात्कार (Rape on model girl) झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी ही तक्रार गंभीरतेने घेत एफआयआर दाखल केला आहे. तरुणी मॉडेल आहे. मुंबईहून तिचा एक जुना ओळखीचा तरुण दिल्लीला आला होता. येथे आल्यानंतर त्यांने तरुणीला भेटण्यासाठी खान मार्केटमध्ये बोलावले. तिथे तो तिला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यावर त्याने तरुणीला चुकीची, अश्लिल वागणूक दिली. एवढेच नाही तर आरोपीने पीडित तरुणीला धमकीही दिली. 
या घटनेनंतर तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपबीती सुनावली. हा तरुण त्याचे वडील आणि अन्य एका नातेवाईकासोबत दिल्लीला आला होता. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ते उतरले होते. या तरुणाने अन्य एका हॉटेलमध्ये रुम बुक केला आणि त्या मॉडेल तरुणीला तिथे घेऊन गेला. 


तक्रारीनुसार मुलीने सांगितले की, आरोपीने तिला 30 जानेवारीला मेसेज करून दिल्लीतील एका लग्न समारंभाला येत असल्याचे सांगितले होते. तेव्हा आपण भेटू असेही सांगितले होते. 20 फेब्रुवारीला त्यांना पहाटे 5 वाजता मेसेज केला होता व भेटण्यासाठी त्याने एका मित्राच्या घरी बोलावले होते. तेव्हा त्या तरुणीने त्याला नकार दिला होता. 
यानंतर दोघेही खान मार्केटमध्ये भेटले, तिथे दोघांनी नाश्ता केला. यानंतर आरोपी पीडित तरुणीला घेऊन हॉटेलमध्ये गेला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यावर एफआयआर दाखल केला आहे. तपास सुरु आहे. 


तरुण दक्षिण मुंबईतील
पीडितेच्या वकिलांनी सांगितले की, तरुणीवर बलात्कार करणारा तरुण हा दक्षिण मुंबईतील आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तरुणीची वैद्यकीय चाचणी झाली आहे. तसेच तिचा जबाबही नोंदवला आहे. तरुण मोठ्या कुटुंबातील आहे. या दोघांची आधी ओळख होती. 

Web Title: 22-year-old model raped by Mumbai's youth in delhi's five-star hotel; FIR registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.