धक्कादायक! फेसबुक लाईव्ह करत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षीय युवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 19:54 IST2020-08-06T19:53:57+5:302020-08-06T19:54:34+5:30
वाडा तालुक्यातील वीरा येथील नवनाथ बोगे वय 22 हा तरुण जव्हार येथील एका हॉटेल मध्ये वेटरचे काम करत होता.

धक्कादायक! फेसबुक लाईव्ह करत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षीय युवकाची आत्महत्या
हुसेन मेमन
जव्हार - शहरातील राममंदिर शेजारील इमारतीत एका 22 वर्षीय तरुणाने फेसबुक लाईव्ह सुरू ठेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी पाच च्या सुमारास घडली आहे.
वाडा तालुक्यातील वीरा येथील नवनाथ बोगे वय 22 हा तरुण जव्हार येथील एका हॉटेल मध्ये वेटरचे काम करत होता, तो हॉटेल मालकाच्या फ्लॅटमध्ये रहायचा अचानक त्याने फेसबुक सुरू करून स्वतः पंख्याला बांधलेल्या नायलॉन दोरीला लटकून लाईव्ह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, सदर घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून ती सोशल मीडियावर पसरल्यामुळे घटनेची खबर लागली आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, दरम्यान जव्हार पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.