घरातून भांडून निघालेल्या मुलीवर २२ दिवस बलात्कार; दोघांपैकी एकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 02:09 IST2020-10-15T02:09:06+5:302020-10-15T02:09:19+5:30

तिरतोलला मला न नेता त्याने चौलियागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गतिरौैतपाटणा खेड्यातील शेतात नेले. तेथे २२ दिवस जबरदस्तीने बंदी बनवून ठेवले व शेतात दोन पुरुषांनी माझ्यावर वारंवार बलात्कार केले, असे ती म्हणाली

22 days rape of a girl who left home after a quarrel; One of the two was arrested | घरातून भांडून निघालेल्या मुलीवर २२ दिवस बलात्कार; दोघांपैकी एकाला अटक 

घरातून भांडून निघालेल्या मुलीवर २२ दिवस बलात्कार; दोघांपैकी एकाला अटक 

कटक (ओदिशा) : आई-वडिलांशी गेल्या महिन्यात भांडून घरातून निघून गेलेल्या मुलीवर (१७, रा. तिरतोल, जिल्हा जगतसिंहपूर) तिला मदत करतो, असे सांगणाऱ्याने २२ दिवस बलात्कार केला.

घरातून निघालेल्या या मुलीला तुला माझ्या मोटारसायकलवर तुझ्या घरी सोडतो, असे सांगणाऱ्याने तिला कटक येथील पोल्ट्री फार्ममध्ये नेले, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले. घरातून बाहेर पडल्यावर ती घरी परत येण्यासाठी येथील ओएमपी स्क्वेअरमधील बसथांब्यावर बसने येण्यासाठी उभी होती. एकाने तिला तुझ्या घरी सोडतो, असे मला सांगितले, असे तिने जिल्हा बाल कल्याण समितीला सांगितले. तिरतोलला मला न नेता त्याने चौलियागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गतिरौैतपाटणा खेड्यातील शेतात नेले. तेथे २२ दिवस जबरदस्तीने बंदी बनवून ठेवले व शेतात दोन पुरुषांनी माझ्यावर वारंवार बलात्कार केले, असे ती म्हणाली. स्थानिक रहिवाशांनी शेतात काही तरी चुकीचे घडत असल्याचे पोलिसांना कळविल्यावर शेतात छापा घातल्यावर तिची सुटका झाली. आरोपींपैकी एकाला अटक झाली असून दुसºयाचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: 22 days rape of a girl who left home after a quarrel; One of the two was arrested