शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

एका कॉलनं घातला घोळ! खऱ्या IAS अधिकाऱ्यालाच ठरवलं बोगस; कागदपत्रे समोर येताच पोलीस चिडीचूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:34 IST

१२ मार्चच्या रात्री १० ते १२ पोलीस राहुल कौशिकच्या घरी पोहचले आणि विनाकारण देता त्यांना ताब्यात घेण्यात आले

मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठ येथे बनावट आयएएस अधिकाऱ्याच्या अटकेवरून अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. बोगस IAS अधिकारी असल्याचा आरोपात पकडलेल्या राहुल कौशिक याने स्वत:ला खरा अधिकारी असल्याचा दावा केला आहे. त्यांच्याकडील दस्तावेजामुळे हे संपूर्ण प्रकरण गुंतागुतीचे बनले आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मौन बाळगलं आहे.

१२ मार्चच्या पोलीस कारवाईत राहुल कौशिक याला ताब्यात घेतले होते. राहुल स्वत:ला IAS अधिकारी असल्याचं दाखवत लोकांना धमकावत असे आणि फोन कॉलच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची दिशाभूल करायचा. पत्रकार परिषद घेत पोलीस अधिकाऱ्यांनी राहुल कौशिकचा बुरखा फाडला आणि ते कुठल्याही शासकीय सेवेत नाहीत असं सांगितले. परंतु या कारवाईनंतर काही तासाने या प्रकरणाला नवं वळण लागले. राहुल कौशिक माध्यमांसमोर आले आणि त्यांनी पोलिसांचा दावा फेटाळून लावला. २००८ साली यूपीएससी परीक्षा पास केली होती. ऑल इंडिया रँकिंग ७२८ आली होती असं राहुलने पत्रकारांना सांगितले.

आपला दावा खरा दाखवण्यासाठी राहुलने अनेक दस्तावेज सादर केले. त्यात भारत सरकारच्या गृह मंत्रालयाशी निगडित ओळख पत्र, ब्यूरो ऑफ पार्लियामेंट्री स्टडीज अँन्ड ट्रेनिंग प्रमाणपत्र, पोस्ट विभागाचे आयडी आणि काही वृत्तपत्रांच्या बातम्यांची कात्रणेही दाखवली. ही कागदपत्रे समोर आणल्यानंतर पोलिसांनी कुठल्याही चौकशीविना एका व्यक्तीला बनावट जाहीर केले का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अचानक घरी आले पोलीस

१२ मार्चच्या रात्री १० ते १२ पोलीस राहुल कौशिकच्या घरी पोहचले आणि विनाकारण देता त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याशी गैरवर्तन केले. मोबाईल फोन जप्त केला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती राहुलच्या कुटुंबाला दिली तेव्हा त्याच्या घरातील सदस्य पोलीस ठाण्यात पोहचले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून राहुल याला घरी नेण्यात आले. माहितीनुसार, २०१७-१८ साली राहुलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातून त्याला निलंबित करण्यात आले होते. राहुल या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा देत आहे. सध्या हे प्रकरण सेट्रंल एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनलकडे प्रलंबित आहे.

फोन कॉलने सुरू झाला वाद

राहुल कौशिकला अटक करण्याचा वाद एका फोन कॉलने सुरू झाला. राहुलने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला फोन केला होता. या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी राहुल कौशिकला अटक केली. या प्रकरणात राहुल कौशिकची मानसिक स्थितीही समोर आली आहे. नोकरी गेल्यानंतर त्याच्यावर मानसिक दडपण आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. राहुल कौशिकला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उभे राहिले आहेत. कुठल्याही चौकशीविना एखाद्याला बनावट अधिकारी घोषित करणे योग्य आहे का? ही कारवाई घाईघाईने का करण्यात आली? यासारख्या विविध प्रश्नांच्या उत्तरांचा शोध राहुलचे वकील घेत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : False Arrest? Cop's Call Snares Real IAS Officer; Police Silent

Web Summary : Meerut police arrested Rahul Kaushik, claiming he was a fake IAS officer. Kaushik presented documents, including government IDs, proving his 2008 UPSC qualification. Police face scrutiny for the hasty arrest and allegations of misconduct, raising questions about the investigation's validity after a phone call dispute.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस