मंत्रालयात नोकरीच्या नावे २० लाख लाटले; उपसचिवांच्या सहीचे बनावट नियुक्ती आदेश; चार आराेपींवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 06:53 AM2023-05-20T06:53:37+5:302023-05-20T06:53:54+5:30

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

20 lakhs in favor of jobs in the ministry; forged appointment orders signed by the Deputy Secretary; A case has been registered against four ARPs | मंत्रालयात नोकरीच्या नावे २० लाख लाटले; उपसचिवांच्या सहीचे बनावट नियुक्ती आदेश; चार आराेपींवर गुन्हा दाखल

मंत्रालयात नोकरीच्या नावे २० लाख लाटले; उपसचिवांच्या सहीचे बनावट नियुक्ती आदेश; चार आराेपींवर गुन्हा दाखल

googlenewsNext

मुंबई : मंत्रालयात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली एकाची २० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार शिवडी परिसरात उघडकीस आला आहे. एवढेच नव्हेतर, तक्रारदारांचा विश्वास बसावा म्हणून भामट्यांनी मंत्रालयातील उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचे बनावट सहीचे नियुक्ती आदेश त्यांना दाखवले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार शिवडीचे राहणारे असून, त्यांच्या वडिलांचा गॅरेजचा व्यवसाय आहे. तरुणाच्या वडिलांच्या मित्राने संदीप बंडू न्यारे याच्याशी त्यांची ओळख करून दिली होती. न्यारे हा मंत्रालयात नोकरी लावतो तसेच आरे दूध विक्री केंद्राचे स्टॉल तयार करून देतो. त्याचे स्वतःचेही स्टॉल आहेत, असे मित्राने सांगितल्याने तरुणाच्या वडिलांचा विश्वास बसला. बापूराव जाधव हा मंत्रालय कर्मचारी असून, तो मंत्रालयात नोकरी लावून देईल, असे न्यारेने त्यांना सांगितले. या प्रकरणी शिपाई सचिन डोळस रुग्णालयाचे खोटे कागदपत्रही दिले 

- वारंवार नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर न्यारे टाळाटाळ करीत होता. त्यामुळे तक्रारदारांनी शिवडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. 
- फसवणूक करणाऱ्या टोळक्याने वैद्यकीय तपासणी करण्याचे जे. जे. रुग्णालयाचे खोटे कागदपत्रही दिल्याचे समजते. 
- त्यानुसार पोलिसांनी न्यारे, जाधव, साठे आणि डोळस यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सर्वांना मंत्रालयात प्रवेश करून द्यायचा तसेच मंत्रालयाच्या बाहेर आणून सोडायचा. हा प्रकार २०२० पासून सुरू होता. न्यारे याने तक्रारदारासह पाच जणांकडून थोडे थोडे करत २० लाख रुपये घेतले होते. 

कोणत्या पदासाठी घेतले पैसे?
मंत्रालयात महसूल व वन विभागात वाहन चालक तर कृषी व पदुम, उच्च व तंत्र शिक्षण विभागात कनिष्ठ सहायक पद आणि सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता अशा ५ पदांसाठी फिर्यादींकडून २० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. 

मंत्रालयात मुलाखत, नियुक्तिपत्रही दिले
तक्रारदाराच्या पत्नीसह त्याची बहीण आणि चुलत भावाची मंत्रालयाच्या कार्यालय क्रमांक ६२५ मध्ये सामान्य प्रशासन विभागात सचिव पदावर कार्यरत असलेल्या नितीन साठे या अधिकाऱ्याच्या समक्ष ४ सप्टेंबर, २०२० रोजी मुलाखत घेण्यात आली आणि त्यांना नियुक्तिपत्र दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

पदानुसार दरांची यादी 
आरोपी बापूराव जाधवने त्याचे ओळखपत्र दाखवत सर्वांना नोकरी लावेल, असे आश्वासन दिले. इतकेच नव्हेतर, कनिष्ठ सहायक पदापासून ते ड्रायव्हरची रेटलिस्टही दिल्याचे उघड झाले.
 

Web Title: 20 lakhs in favor of jobs in the ministry; forged appointment orders signed by the Deputy Secretary; A case has been registered against four ARPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.