विष प्रयोग करुन २० श्वान आणि ७ मांजरांचा घेतला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 21:03 IST2019-06-04T21:00:56+5:302019-06-04T21:03:06+5:30

हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

 20 dogs and 7 cats has died due to using poison in food | विष प्रयोग करुन २० श्वान आणि ७ मांजरांचा घेतला बळी

विष प्रयोग करुन २० श्वान आणि ७ मांजरांचा घेतला बळी

ठळक मुद्दे या प्रकारामुळे परिसरातील २० श्वान आणि ७ मांजरींचा मृत्यू झाला आहे. नेमका हा प्रकार का करण्यात आला याचा देखील तपास पोलीस करित आहेत.

अंबरनाथ - अंबरनाथ येथील स्टेशन परिसरातील भीमनगर भागात सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने खाद्यपदार्थातून या परिसरातील भटके कुत्रे आणि मांजरींना विष प्रयोग केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील २० श्वान आणि ७ मांजरींचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 
भीमनगर भागात हा सर्व प्रकार घडला आहे. सकाळी स्थानिक रहिवाशांना चार ते पाच कुत्रे हे परिसरात मृत अवस्थेत आढळले. हा प्रकार कोणालाच गंभिर वाटला नाही. मात्र याच भागातील इतर ठिकाणी देखील काही कुत्रे मृत अवस्थेत असल्याचे लक्षात येताच या भागातील नागरिकांनी मृत कुत्र्यांचा शोध घेतला. तसेच या घटनेची माहिती पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनालाही स्थानिकांनी दिली. पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना २० श्वान आणि ७ मांजरी देखील मृत अवस्थेत असल्याचे लक्षात आले. एकाच दिवशी येवढय़ा मोठय़ा प्रमाणात कुत्रे आणि मांजरींचा मृत्यू झाल्याने या प्रकारात विष प्रयोग करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र हा विष प्रयोग कढातुन करण्यात आला आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. पाव, ब्रेड किंवा अन्न पदार्थातुन हा विष प्रयोग झाल्याचे समोर येत आहे. मात्र हा प्रकार कोणत्या व्यक्तीने केला हे अजुनही स्पष्ट झालेले नाही. नेमका हा प्रकार का करण्यात आला याचा देखील तपास पोलीस करित आहेत. या परिसरातील सर्व कचरा कुंडय़ांमधील अन्न पदार्थ, ब्रेड यांचे नमुने एकत्रित करुन नेमका कोणता विष प्रयोग झाला आहे याची माहिती घेतली जात आहे. 

Web Title:  20 dogs and 7 cats has died due to using poison in food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.