शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

शेलपिंपळगावमध्ये २० कोटींचे अमली पदार्थ जप्त; ५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 10:42 AM

Pune Crime News : अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी काही जण शेलपिंपळगाव येथे येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

शेलपिंपळगाव - शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे विक्रीसाठी आणलेले २० कोटी रुपयांचे अमली पदार्थ (मेफेड्रॉन, एमडी) पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने  जप्त केले. अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि.७) दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई केली असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

चेतन फक्कड दंडवते (वय २८, रा. मलठण - आंबेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय २५, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय २५, रा. पाचर्णे मळा, ता.शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (वय ४४, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय ३१, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी काही जण शेलपिंपळगाव येथे येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी एकच्या सुमारास दशमेज ढाब्याजवळ पोलिसांनी सापळा लावून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून २० कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची कार रोख २३ हजार १०० असा एकूण २० कोटी पाच लाख २३ हजार १०० रुपयांचा ऐवज पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. 

याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांनी बुधवारी (दि. ७) याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसArrestअटक