ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकून ग्राहकांसह २० जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 20:40 IST2021-02-20T20:39:35+5:302021-02-20T20:40:49+5:30
Raid on Orcheshtra Bar : विशेष म्हणजे अटक ग्राहक हे गुजरात, उत्तर प्रदेश, सिल्वासा येथील आहेत.

ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकून ग्राहकांसह २० जणांना अटक
ठळक मुद्देया प्रकरणी ८ ग्राहक, ७ बारबाला, ५ बार कर्मचारी अश्या वीस जणांना अटक करण्यात आली. तर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
मीरारोड - काशीमीरा पोलिसांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या मेला ह्या ऑर्केस्ट्रा बार वर धाड टाकून ८ ग्राहक, ७ बारबाला सह २० जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक ग्राहक हे गुजरात, उत्तर प्रदेश, सिल्वासा येथील आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखी गुरुवारी रात्री पोलीस पथकाने मेला बार वर धाड टाकली. त्यावेळी बार मध्ये ७ बारबाला तोकड्या कपड्यात अश्लील अंग विक्षेप करत होत्या. या प्रकरणी ८ ग्राहक, ७ बारबाला, ५ बार कर्मचारी अश्या वीस जणांना अटक करण्यात आली. तर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.