२ हजारांमुळे महिलेला चोरट्यांनी लावला १ लाखाचा चुना 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:23 PM2018-08-06T17:23:49+5:302018-08-06T17:24:44+5:30

पेटीएमचे रिचार्ज जिंकले असे सांगून चोरट्याने लुटले महिलेला

For 2 thousand rupees, the thieves took the lime of 1 lakh | २ हजारांमुळे महिलेला चोरट्यांनी लावला १ लाखाचा चुना 

२ हजारांमुळे महिलेला चोरट्यांनी लावला १ लाखाचा चुना 

Next

मुंबई - तुम्ही २ हजार रुपयांचे पेटीएम रिचार्ज जिंकला असल्याचे सांगून फिर्यादी महिलेचे आणि तिच्या कुटुंबियांच्या डेबिट, क्रेडिट कार्डवरून चक्क ९९ हजारांना चुना लावला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनीउत्तर प्रदेशातील रहिमपूर जिल्ह्यातील महुधा गावातून आरोपी शुभकरण उर्फ लाला ब्रिजलाला सिंह (वय - २६) आणि अभिलाष उर्फ गौतम करण सिंह (वय - १९) यांना अटक केली आहे. गंडा घातलेल्या रक्कमेतून या दोघांना ऑनलाईन मोबाईल खरेदी केला आणि हे चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. 

उत्तर प्रदेशातील मोबाईल वेड्या दोन चोरट्यांनी एका महिलेस तुम्ही पेटीएमचे २ हजार रुपयांचे बक्षीस जिंकलं असून तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम आहे का ? अशी आरोपी अभिलाषने विचारणा केली. त्यानंतर फिर्यादी महिलेने माझ्याकडे पेटीएम नसल्याचे सांगितले. त्यावर अभिलाषने पेटीएम इन्स्टॉल करण्यास सांगितले. दरम्यान, पेटीएम इन्स्टॉल केल्यानंतर पुढील प्रक्रियेदरम्यान अभिलाषने महिलेला कॉल करून तुम्हाला ओटीपी आला का ? असे विचारात आपल्या बतावणीत गुंतवून चोरट्याने फिर्यादी महिलेला पेटीएम नोंदणीसाठी मागितले जाणारे एटीएमची माहिती वधवून घेतली आणि ती एटीएमची माहिती ऐकून अभिलाषने शुभकरणला सांगितली आणि त्या माहितीच्या आधारे चोरट्यांनी फिर्यादीसह अन्य माहिती दिलेल्या लोकांच्या एटीएममधून ९९ हजार रुपये काढले. दोघांनी या पैश्यातून ऑनलाईन ६९ हजारांचा महागडा मोबाईल फोनची ऑर्डर दिली आणि त्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकले अशी माहिती मलबार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी दिली. तसेच चोरट्यांचा माग काढत पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात पोचले आणि रहिमपूर जिल्ह्यातील महुधा गावातून दोघांना अटक केली आणि पोलीस मुंबईत घेऊन आले. पोलिसांनी ऑनलाईन ऑर्डर रद्द केली असून चोरट्यांकडून ३३ हजार १०० रुपये इतकी रक्कम हस्तगत केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मयेकर यांनी दिली. 

Web Title: For 2 thousand rupees, the thieves took the lime of 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.