शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:52 IST2025-07-19T15:50:35+5:302025-07-19T15:52:29+5:30

गुजरातमध्ये भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन पादचाऱ्यांचा धडक बसून दुर्दैवी मृत्यू झाला.

2 people killed in Gujrat by policemen who were racing with SUV father handed over to police | शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं

शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं

Gujarat Accident: गुजरातमधील भावनगरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एका भरधाव कारने अनेक पादचाऱ्यांना आणि एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. कारचालक तरुण हा पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे समोर आलं आहे. २० वर्षीय आरोपी हर्षराज गोहिलने त्याच्या मित्रासोबत रेस लावली होता. तो पांढऱ्या रंगाची क्रेटा चालवत होता आणि त्याचा मित्र लाल रंगाची ब्रेझा कार चालवत होता. हर्षराजच्या गाडीने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.

भावनगरच्या कालियाबीड भागात शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. हर्षराज गोहिलने भरधाव वेगाने एसयूव्ही चालवत रहदारीच्या रस्त्यावर एकामागून एक अनेक लोकांना धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. पांढऱ्या रंगाची क्रेटा कार दोन पादचाऱ्यांना आणि स्कूटरला धडकताना दिसत आहे. गाडीची धडक इतकी जोरात होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

आरोपी हर्षराज हा स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक उपनिरीक्षक अनिरुद्ध गोहिल गोहिल यांचा मुलगा आहे. हर्षराज १२० ते १५० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत होता. अचानक त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने लोकांना  आणि वाहनांना धडक दिली. त्यानंतर, कार घसरली आणि एका स्कूटरला धडकली. स्कूटरचा टायरही फुटला आणि त्यावर बसलेले दोघेही जण जखमी झाले. या भीषण अपघातात इतर अनेक वाहनांचेही नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच आरोपीचे वडील अनिरुद्ध गोहिल घटनास्थळी पोहोचले. सगळा प्रकार पाहून त्यांनी तिथेच मुलाला चोप देण्यास सुरुवाती केलीआणि नंतर स्वतः नियंत्रण कक्षाला फोन केला. यानंतर अनिरुद्ध गोहिल मुलाला घेऊन नीलमबाग पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हर्षराजला गाडी चालवण्याची आवड होती आणि तो कधीकधी त्याच्या मित्रांसोबत शर्यतीतही सहभागी व्हायचा.

या अपघातात रस्त्याने जाणारे ३० वर्षीय भार्गव भट्ट आणि ६५ वर्षीय चंपाबेन वाचानी यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. भार्गव भट्टचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. ही घटना घडली त्यावेळी तो कामावर जात होता.

Web Title: 2 people killed in Gujrat by policemen who were racing with SUV father handed over to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.