समुद्रात प्रदूषणाच्या नावाने उकळले २ कोटी, ब्लॅकमेलिंग ३ लाख डॉलरची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 13:13 IST2023-11-07T13:13:02+5:302023-11-07T13:13:36+5:30
एवढ्यावर न थांबता त्याने आणखीन ३ लाख डॉलरची मागणी केली असता जहाज कंपनीच्या संचालकाने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदविला आहे.

समुद्रात प्रदूषणाच्या नावाने उकळले २ कोटी, ब्लॅकमेलिंग ३ लाख डॉलरची मागणी
मुंबई : कंपनीच्या जहाजातून मेक्सिको ते यू एस पोर्ट असा प्रवास करताना सांडपाणी समुद्रात टाकल्याचे व्हिडीओ कोस्टगार्डकडे देत कारवाईची भीती घालून उत्तराखंडच्या ठगाने १ कोटी ९५ लाख रुपये उकळले. एवढ्यावर न थांबता त्याने आणखीन ३ लाख डॉलरची मागणी केली असता जहाज कंपनीच्या संचालकाने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदविला आहे.
कफपरेड येथील रहिवासी असलेले खासगी शिप कंपनीचे संचालक पवन सतीशचंद रसूद (५६) यांच्या तक्रारीनुसार,
२४ जून ते १ जुलै २०२२ दरम्यान त्यांना अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल केला. क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत ३ लाख डॉलरची मागणी
केली.