शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पुजारी हल्लाप्रकरणी कांदिवलीत २ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 11:16 IST

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार पुजारी आशिषकुमार दुबे (३४) हे १७ ऑगस्ट रोजी रात्री १०:४५ च्या सुमारास  इराणीवाडीमधील घरी पूजापाठ करून मेव्हणा अजित अग्निहोत्री यांच्यासोबत स्कूटरने घरी जात होते.

मुंबई : कांदिवली येथील लालजीपाड्यात गजबजलेल्या रस्त्यावर सशस्त्र जमावाने दोन पुजाऱ्यांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. प्रथम दिगंबर खिल्लारे (२२) आणि छोटू मणियार (२२) अशी या अटक केलेल्यांची नावे असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार पुजारी आशिषकुमार दुबे (३४) हे १७ ऑगस्ट रोजी रात्री १०:४५ च्या सुमारास  इराणीवाडीमधील घरी पूजापाठ करून मेव्हणा अजित अग्निहोत्री यांच्यासोबत स्कूटरने घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अनोळखी मोटरसायकलस्वाराने धडक मारल्याने ते दोघेही जमिनीवर पडले. त्यांनी मोटरसायकलस्वाराला जाब विचारताच तो धक्काबुक्की करत तेथून निघून गेला. या अपघातात दुबे यांच्या पायाला मार लागून सूज आली होती. त्यामुळे ते काही वेळ फुटपाथवर बसले आणि पुन्हा मेहुण्यासोबत दुचाकीने घरी निघाले.

त्यानंतर रात्री ११ वाजता लालजीपाड्यानजीक अभिलाख जंक्शन सिग्नल जवळ दुबे यांना धडक देणारी व्यक्ती मोटरसायकल घेऊन आली. त्याने ‘तू मला मारहाण का केली’ अशी विचारणा करत सोबत आलेल्या तीन तरुणांसह दुबे आणि त्यांच्या मेव्हण्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील हल्लेखोरांपैकी एकाने खिशातून चाकू काढत दुबे यांच्यावर हल्ला केला. त्यातील एकाने लाकडी बांबूने दोघांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. त्यानुसार कांदिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सदाशिव सावंत आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुबे यांनी तपास सुरू केला.

अन्य आरोपींसाठी शोधपथकरुग्णालयातून उपचार घेऊन दुबे यांनी पत्नीसह घर गाठले. पोलिसांनी त्यांना संपर्क केला असता ते गुन्हा दाखल करण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ ऑगस्ट रोजी त्यांचा जबाब घेत पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याचे कलम १०९, ११५(२), ११८(१), २२६(१), २८१,३(५) अंतर्गत हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील दोन हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी