1,914-page affidavit filed against Arnab Gaeswami and others; The hearing will be held on December 16 | अर्णब गाेस्वामींसह अन्य दाेघांवर 1,914 पानांचे दाेषाराेपपत्र दाखल; 16 डिसेंबरला हाेणार सुनावणी             

अर्णब गाेस्वामींसह अन्य दाेघांवर 1,914 पानांचे दाेषाराेपपत्र दाखल; 16 डिसेंबरला हाेणार सुनावणी             

रायगड ः रिपब्लिक भारत टिव्हीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांच्यासह नितेश सारडा आणि फिराेज शेख यांच्या विराेधात सुमारे 1914 पानांचे दाेषाराेपपत्र रायगड पाेलिसांनी शुक्रवारी दाखल केले हाेते. त्यावर 16 डिसेंबर राेजी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी हाेणार आहे. 

नितेश सारडा आणि फिराेज शेख यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आधीच दाखल केलेला जामिन अर्ज शनिवारी  मागे घेतला. तसेच याच न्यायालयातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निकालासाठी 19 डिसेंबर तारीख दिली आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील अॅड. भूषण साळवी यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.

प्रसिध्द वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्तेचा ठपका गाेस्वामी, सारडा आणि शेख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रायगड पाेलिसांनी सुमारे एक हजार 914 पानांचे दाेषाराेपपत्र अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात शुक्रवारी दाखल केले हाेते. अन्वय नाईक यांनी गाेस्वामी, सारडा आणि शेख या आराेपींचे वास्तुसजावटीचे काम केले हाेते आणि केलेल्या कामाची रक्कम आराेपींनी नाईक यांना दिली नाही. त्यामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. नाईक यांना आत्महत्या करण्यास आराेपींनीच प्रवृत्त केल्याचे दाेषाराेपपत्रात पाेलिसांनी नमुद केले आहे, असेही अॅड.साळवी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गाेस्वामी, सारडा आणि शेख यांच्या विराेधातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निर्णय जिल्हा सत्र न्यायालय आज देण्याची शक्यता हाेती. मात्र न्यायालयाने आता 19 डिसेंबर 2020 तारीख दिली आहे.                           

Web Title: 1,914-page affidavit filed against Arnab Gaeswami and others; The hearing will be held on December 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.