१८ वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 20:18 IST2019-06-03T19:49:05+5:302019-06-03T20:18:17+5:30

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली

 18-year-old girl raped by a gag drug | १८ वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार

१८ वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार

ठळक मुद्दे २० ते २५ वयोगटातील अबलोन राणीला घेण्यासाठी आल्यावर बहिणीची विचारणा केल्यावर बीचवर असल्याचे सांगितले. वालीव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. 

नालासोपारा - मुंबईच्या विक्रोळी येथे राहणाऱ्या १८ वर्षीय पीडित तरुणीला नायगाव येथे राहणाऱ्या आरोपी तरूणाने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून वालीव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबईच्या विक्रोळी विभागात राहणाऱ्या १८ वर्षीय राणीची (बदलेले नाव) बहीण नायगाव परिसरात राहते. २२ मे ला बहिणीने राणीला नायगाव येथील घरी भेटण्यासाठी बोलावले होते आणि नायगाव येथील रिक्षा स्टँडजवळ अबलोन नावाचा तरुण गाडी घेऊन घेण्यास येईल असे बहिणीने राणीला फोनवरून सांगितले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात २० ते २५ वयोगटातील अबलोन राणीला घेण्यासाठी आल्यावर बहिणीची विचारणा केल्यावर बीचवर असल्याचे सांगितले. नंतर त्याने गाडीमध्ये बसवून बिचकडे नेताना शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन ती शुद्धीवर नसताना बलात्कार केला आहे. राणी हिने शुक्रवारी माणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करत तपासासाठी वालीव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. 

 

Web Title:  18-year-old girl raped by a gag drug