शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

संतापजनक! जीन्स घालते म्हणून काकाने आणि आजोबांनी केली तरुणीची हत्या; अशी झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 09:01 IST

Crime News : जीन्स घालते म्हणून एका तरुणीची तिच्या काकांनी आणि आजोबांनी हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. जीन्स घालते म्हणून एका तरुणीची तिच्या काकांनी आणि आजोबांनी हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. 17 वर्षीय तरुणीला तिच्या काकांनी आणि आजोबांनी जीन्स घालून नको असं वारंवार सांगितलं होतं. मात्र तिने त्याची ही गोष्ट ऐकण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या या दोघांनी टोकाचं पाऊल उचलत तिची हत्या केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील लुधियानात नोकरी करत असल्यामुळे ही मुलगी आपल्या आईवडिलांसोबत शहरात राहत होती. मात्र सध्या कोरोनाकाळात हे कुटुंब गावी आलं होतं. शहराप्रमाणे गावात जीन्स घालून फिरण्याला मुलीच्या काकाचा विरोध होता. यावरून त्या मुलीमध्ये आणि काकामध्ये अऩेकदा वादही होत असे. हाच राग मनात ठेऊन काकाने आणि मुलीच्या आजोबांनी तिला बेदम मारहाण केली. दोघांनी केलेल्या मारहाणीदरम्यान भिंतीवर डोकं आपटून या मुलीचा मृत्यू झाला.

आपला गुन्हा लपवण्यासाठी या दोघांनी तो मृतदेह गावाबाहेर नेऊन नदीत फेकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह खाली फेकत असताना मुलीचा पाय रेलिंगमध्ये अडकला आणि मृतदेह नदीच्या पुलावर लटकू लागला. त्यानंतर आपला गुन्हा उघडकीला येईल, या भीतीने दोघांनी तिथून पळ काढला. आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस या मुलीचा शोध घेत होते. पोलिसांना हा मृतदेह नदीच्या पुलावर लटकत असल्याचे आढळून आले आणि हत्येचा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

नात्याला काळीमा! मुलगाच झाला वैरी, विजेचा शॉक देऊन वडिलांची हत्या, गुपचूप केले अंत्यसंस्कार अन्...

नात्याला काळीमा फासणारी अशीच एक घटना आता समोर आली आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबच्या गुरुदारपूरमध्ये एका मुलाने आपल्या वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. संतापजनक बाब म्हणजे मुलाने विजेचा शॉक देऊन वडिलांना संपवलं आणि कोणाला काही संशय येऊ नये म्हणून वडिलांवर एकट्यानेच अंत्यसंस्कार करून टाकले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी वडिलांच्या हत्येप्रकरणी मुलाला अटक केली आहे. हरपाल सिंह असं आरोपीचं नाव असून त्याने वडील तरसेम सिंह यांना रात्री ट्रॉलीमध्ये घेऊन अंत्यसंस्कार केले आणि राखही विसर्जित केली. पोलिसांनी तरसेम यांचा मोठा मुलगा रछपाल सिंह याने दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस