१७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा महिलेच्या पडला प्रेमात; संधी मिळताच बागेत प्रपोजही केली, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 10:50 IST2021-05-14T10:45:00+5:302021-05-14T10:50:32+5:30

बागेत फिरायला एक कुटुंब आले होते. त्या कुटुंबात एक महिला आपल्या दोन मुलांसह फिरायला आली होती.

17-year-old boy falls in love with woman; He also proposed in the garden | १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा महिलेच्या पडला प्रेमात; संधी मिळताच बागेत प्रपोजही केली, अन्...

१७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा महिलेच्या पडला प्रेमात; संधी मिळताच बागेत प्रपोजही केली, अन्...

नवी दिल्ली: मध्य प्रदेशमधील जबलपूर शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षांच्या मुलाने २ मुलांच्या महिलेच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर संबंधित तरुणाने या महिलेचा दररोज पाठलाग करण्यास सुरुवात केली. तसेच काही दिवसांनी संधी मिळताच अल्पवयीन मुलाने तिला प्रपोज केल्याची माहिती संबंधित महिलेने पोलिसांना दिली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मोहम्मद दिलशाद  सायंकाळी जबलपूर शहरातील भंवरताल बागेत गेला होता. त्यानंतर त्याने बागेतच जोर जोरात कुणाला तरी ‘आय लव यू’ असं ओरडण्यास सुरुवात केली. बागेतील लोकांनी त्याला विचारणा करुन शांत राहण्यास सांगितले असता आरोपी लोकांवरच भडकू लागला. 

बागेत फिरायला एक कुटुंब आले होते. त्या कुटुंबात एक महिला आपल्या दोन मुलांसह फिरायला आली होती. या महिलेच्या मागे मोहम्मद दिलशाद फिरु लागला. त्यानंतर त्यांने मला फक्त एकदा तुमच्या सोबत फोटो काढू द्या, असा हट्टच धराला. महिलेने वारंवार नकार देऊनही मोहम्मद दिलशाद जबरदस्ती करु लागल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. 

मोहम्मद दिलशाद हट्ट बघून लोकांच्या मदतीने त्या महिलेने कोड रेडला याची खबर दिली. माहिती मिळाल्यानंतर टीमचे सदस्य अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्या सरफिऱ्या मोहम्मद दिलशाद भूत इतक्यात त्याच्या डोक्यातून काढले. त्याला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. 

 

Web Title: 17-year-old boy falls in love with woman; He also proposed in the garden