शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

ब्राह्मण मुलीसाठी 16 लाख, OBC साठी 12 लाख, तर SC-ST साठी...! छांगूर बाबाचं धर्मांतरण 'रेट कार्ड' बघून तुमची झोप उडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 23:59 IST

छांगूरने ब्राह्मण, क्षत्रिय, ओबीसी-एससी-एसटीनुसार, हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी रेट कार्डदेखील तयार केले होते. एखाद्या हॉटेलच्या रेट कार्डप्रमाणेच धर्मांतराणाचे रेटकार्ड तुम्ही कधी ऐकले अथवा बघितले नसेल. छांगूर उर्फ जलालुद्दीनच्या नेटवर्कने ब्राह्मण मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतरण करण्यासाठी १५ ते १६ लाख रुपयांचा दर निश्चित केला होता...

उत्तर प्रदेशात धर्मांतरण रॉकेट चालवणारा ७८ वर्षीय धंधेबाज छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन सध्या जबरदस्त चर्चेत आहे. त्याच्या आलिशान कोठीवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. याचवेळी अनेक धक्कादायक खुलासेही समोर येत आहेत. या रॅकेटमध्ये नसरीन नावाची एक तरुणीही आहे. जी कधी काळी सिंधी हिंदू होती.

हिंदू मुलींना प्रेमाच्या आणि आमिषाच्या जाळ्यात खेचून त्यांना मुस्लीम बनवणाऱ्या, एका मोठ्या धार्मिक रॅकेटचा मास्टरमाइंड असलेल्या छांगूरने सर्वप्रथम हिला आणि हिच्या पतिलाच धार्मिक जाळ्यात अडकवले आणि हिला नीतूचे नसरीन बनवले. यानंतरच्या धर्मांतराच्या खेळात ही नसरीनच छांगूरचा सर्वात मोठा मोहरा बनली. हीच हिंदू मुलींना फसवून छांगूरकडे आणायची आणि नंतर त्यांचेही धर्मांतर करायची. आता या छांगूर बाबाचं धर्मांतरण 'रेट कार्ड'ही समोर आलं आहे.

ब्राह्मण मुलीच्या धर्मांतरासाठी १५ ते १६ लाख रुपये... -छांगूरने ब्राह्मण, क्षत्रिय, ओबीसी-एससी-एसटीनुसार, हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी रेट कार्डदेखील तयार केले होते. एखाद्या हॉटेलच्या रेट कार्डप्रमाणेच धर्मांतराणाचे रेटकार्ड तुम्ही कधी ऐकले अथवा बघितले नसेल. छांगूर उर्फ जलालुद्दीनच्या नेटवर्कने ब्राह्मण मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतरण करण्यासाठी १५ ते १६ लाख रुपयांचा दर निश्चित केला होता. याशिवाय क्षत्रिय राजपूत मुलींना मुस्लीम बनवण्यासाठीही त्याने १५ ते १६ लाख रुपये दर निश्चित केला होता.

OBC प्रवर्गातील हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी 10 ते 12 लाख फिक्स - याशिवाय, जर कुणी मागास जातीतील अर्थात ओबीसी प्रवर्गातील हिंदू मुलीचे इस्लाममध्ये धर्मांतरण केले, तर त्यासाठी त्याला १० ते १२ लाख रुपये दर निश्चित करण्यात आला होता. जर कोणी इतर हिंदू जातीतील अर्थात एससी-एसटी प्रवर्गातील मुलींचे धर्मांतरण केले तर त्याचा दर ८ ते १० लाख रुपये ठेवण्यात आला होता. अशा प्रकारे धर्मांतराचे रेट कार्ड, ही धक्कादायक गोष्ट आहे. 

या रेट कार्डवरून प्रश्न निर्माण होतो की, या छांगूरला हिंदूंच्या धर्मांतरासाठी असा किती परदेशी निधी मिळत होता? याच निधूतून त्याने दर्ग्याजवळच कोट्यवधींचे हिंदू धर्मांतराचे बेकायदेशीर हेडक्वार्टर उभारले होते का?

3 ते 4 हजार हिंदूंची लिस्टही तयार होती -माध्यमांतील वृत्तांनुसार, छांगूरच्या धर्मांतर टोळीने ३ ते ४ हजार हिंदूंची यादीही तयार केली होती. जे सॉफ्ट टार्गेट होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे, जवळपास ४० हिंदूंचे आधीच धर्मांतर केल्याचा दावाही केला जात आहे. हिंदू धर्मांतराच्या या खळबळजनक प्रकरणात ९ आरोपी आहेत. मात्र अद्याप केवळ ४ जणांनाच अटक करण्यात आली आहे. यूपी एटीएसने नोव्हेंबर २०२४ मध्ये छांगूरविरुद्ध एफआयआर दाखल केला होता, मात्र अटक ५ जुलै रोजी करण्यात आली. अट करण्यात आली, तेव्हा छांगूर आणि नसरीन लखनऊमधील स्मार्ट रूम हॉटेलमध्ये वडील आणि मुलगी असल्याचे भासवून लपून बसले होते.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMuslimमुस्लीमIslamइस्लामHinduहिंदू