शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

गंमत म्हणून मुख्याध्यापक, शिक्षिका, मुलींना पॉर्न क्लिप पाठवत होता; पुण्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 13:21 IST

लहान मुलांच्या हाती मोबाईल गेल्याने ते चुकीच्या मार्गाने जात आहेत. याचे हे उदाहरण आहे. या विद्यार्थ्याविरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देही घटना 25 ऑगस्ट ते 23 डिसेंबर 2019 दरम्यान घडलेली आहे. स्मार्टफोन आणि गॅजेट्समुळे शाळेतील विद्यार्थी बिघडू लागल्याची ओरड सर्वत्र होत आहे. पुण्यातील एका नामवंत शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबई : स्मार्टफोन आणि गॅजेट्समुळे शाळेतील विद्यार्थी बिघडू लागल्याची ओरड सर्वत्र होत आहे. पुण्यातील एका नामवंत शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पाल्यांना मोबाईल देताना पालकांवर विचार करण्याची वेळ आली आहे. एका विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापकांपासून वर्ग मैत्रिणींपर्यंत फेक मेल आयडीद्वारे पॉर्न क्लिप पाठविल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

लहान मुलांच्या हाती मोबाईल गेल्याने ते चुकीच्या मार्गाने जात आहेत. याचे हे उदाहरण आहे. या विद्यार्थ्याविरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 ऑगस्ट ते 23 डिसेंबर 2019 दरम्यान घडलेली आहे. याकाळात मुख्याध्यापकांपासून शिक्षिका आणि 65 विद्यार्थीनींना सतत पॉर्न व्हिडीओ पाठविण्यात आले. हळू हळू सर्वांनाच याची कुणकुण लागली, की हे अनेकांसोबत होत आहे. जेव्हा हे प्रकरण शाळा प्रशासनाकडे गेले तेव्हा चौकशी सुरू झाली. यानंतर तपासात ज्या मेल आयडीवरून या क्लिप पाठविल्या जात होत्या त्याचा आयपी अॅड्रेस शोधण्यात आला. तेव्हा एका परदेशातून पुण्यात आलेल्या एका विद्यार्थ्याचा शोध लागला. 

हा विद्यार्थी अभ्यासात हुशार आणि टेक्नोसेव्ही आहे. त्यांने गुन्हा कबूल करत हे सर्व गंमत म्हमून केल्याचे सांगितले. त्याला हे करणे गुन्हा असल्याचे माहिती नव्हते. तो त्याच्या वर्गमित्र आणि शिक्षकांना त्रास देणार होता. या कबुलीनंतर शाळेने त्याला काढून टाकले होते. नंतर तो त्याच्या देशात निघून गेला होता. 

मात्र, शाळेने काही महिन्यांनंतर आता पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. यानंतर हे प्रकरण सायबर क्राईमला वर्ग झाले. पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी सांगितले की, शाळेने कारवाई करण्यापूर्वीच तपास केला होता. त्यानंतर आमच्याकडे खूप उशिराने संपर्क साधला. एका शिक्षिकेने तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी केलेल्या चौकशीत या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांनाही हे मेल केले होते. यामुळे आरोपी विद्यार्थ्याविरोधात पॉक्सो कायद्यासह आयटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला बाल कल्याण समितीसमोर आणले जाणार आहे. 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाSchoolशाळाTeacherशिक्षकMolestationविनयभंग