त्याला घरातून पळताना आईने पाहिले अन्...; अल्पवयीन मुलावर सरकारी कर्मचाऱ्यांचा अत्याचार, ९ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:17 IST2025-09-17T16:15:27+5:302025-09-17T16:17:41+5:30
केरळमध्ये गेल्या दोन वर्षांत १६ वर्षीय मुलावर १४ वेगवेगळ्या पुरूषांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली.

त्याला घरातून पळताना आईने पाहिले अन्...; अल्पवयीन मुलावर सरकारी कर्मचाऱ्यांचा अत्याचार, ९ अटकेत
Kerala Crime: केरळच्या कासरगोड जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलावर १४ पुरूषांनी अत्याचार केल्याची एक घृणास्पद घटना समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांत १६ वर्षीय मुलावर १४ वेगवेगळ्या पुरूषांनी लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली असून त्यामध्ये दोन सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाच्या आईला त्याच्या हालचालींवर संशय आल्याने हे प्रकरण उघडकीस आले.
एका अॅपमध्ये अडकून १६ वर्षीय मुलावर किमान १४ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. पीडित मुलाने डेटिंग अॅपद्वारे आरोपीशी संपर्क साधला होता. या प्रकरणात एक सहाय्यक शिक्षण अधिकारी आणि रेल्वे संरक्षण दलाचा सदस्य यांचा समावेश असून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, स्थानिक राजकारण्यासह काही आरोपी फरार आहेत.
मुलाच्या आईला त्यांच्या घरी एक अनोळखी व्यक्ती दिसली तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. तिला पाहून तो माणूस पळून गेला. आईने तिच्या मुलाला विचारले असता, त्याने तिला सर्व काही सांगितले. तिने राज्याच्या बाल संरक्षण हेल्पलाइनला याची माहिती दिली आणि त्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की,या अॅपमध्ये सामील होण्यासाठी युजर्सना त्यांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहोत की नाही हे सांगावे लागतं. मुलाकडे स्वतःचा मोबाईल फोन असल्याने, त्याने अल्पवयीन असूनही जाणूनबुजून अॅपवर स्वतःला प्रौढ असल्याचे दाखवले. त्याच्या पालकांचे मुलाच्या मोबाईल फोनवर नियंत्रण नव्हते आणि गेल्या दोन वर्षांपासून तिचे शोषण होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत अंदाजे १५ जणांविरुद्ध १४ गुन्हे दाखल केले आहेत. फरार झालेल्यांमध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीगचा एक युथ लीग कार्यकर्ता आहे. सर्व आरोपी २५ ते ५१ वयोगटातील आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात LGBTQ समुदायात लोकप्रिय असलेल्या एका मोबाईल डेटिंग अॅपपासून झाली. पीडित मुलाने हे अॅप डाउनलोड केले आणि त्याद्वारे तो १४ वेगवेगळ्या पुरुषांच्या संपर्कात आला. त्यानंतर या पुरुषांनी कासारगोड, कन्नूर, एर्नाकुलम आणि कोझिकोड जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.