शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

13 वर्षाच्या मुलाने टॉयलेटमध्ये 1 वर्षाच्या चिमुरडीची केली हत्या, वडिलांच्या अपमानाचा बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 21:07 IST

Murder Case : सध्या त्याची चौकशी सुरू असून लवकरच त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

लखनौ :  उत्तर प्रदेशातील लखनौ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १३ वर्षीय मुलाने एक वर्षाच्या चिमुकलीची हत्या  केली आहे. ही घटना लखनौच्या सैरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यानंतर या मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असून लवकरच त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीया मुलाला आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. त्यामुळे त्याने मुलीची हत्या केली. तिला शाळेतील पाण्याच्या टाकीत टाकले. इतकेच नव्हे तर मुलीचा मृतदेह वर येऊ नये म्हणून आरोपी मुलाने तिच्या पायाला वीट बांधली होती.

सैरपूर पोलीस ठाणे हद्दीतील जुगौर गावात सुशील पांडे यांची १ वर्षाची मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर सुशील यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस तपासादरम्यान २ अल्पवयीन मुले चिमुकलीला शाळेच्या दिशेने घेऊन गेल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी शाळेत झडती घेतली असता शौचालयातील पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह पडलेला आढळला. मुलीचा पाय विटेने बांधलेला होता, तर तिच्या अंगावर कपडे नव्हते. नंतर  पोलिसांनी पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढला. तसेच शवविच्छेदनासाठी पाठवला आणि संपूर्ण प्रकरणाचा तासभर तपास केल्यानंतर या प्रकरणाचा खळबळजनक खुलासा झाला. त्यावेळी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने या निष्पाप मुलीची हत्या केल्याचं उघड झालं. 

तरुणीवर अनेकवेळा बलात्कार केला, बळजबरीने लग्न केले, मग क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

उत्तर विभागाचे पोलीस उपायुक्त एस. चिनप्पा यांनी मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून करणारा अल्पवयीन मुलगा ड्रग्जच्या आहारी गेलेला असून तो अनेकदा लोकांना त्रास देत असतो. त्याच्या कुटुंबीयांकडेही अनेकदा तक्रारी केल्या आहेत. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपी अल्पवयीन मुलाने चिमुकलीची हत्या केली. सध्या त्याची चौकशी सुरू असून लवकरच त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश