१२ वर्षीय शाळकरी मुलगा घरातून झाला अचानक बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 21:04 IST2019-10-07T21:02:09+5:302019-10-07T21:04:15+5:30
ही घटना भिवंडी शहरातील कामतघर, गणेशनगर परिसरात घडली असल्याचे समोर आले आहे.

१२ वर्षीय शाळकरी मुलगा घरातून झाला अचानक बेपत्ता
ठाणे - भिवंडी शहरात १२ वर्षीय शाळकरी मुलगा अचानक घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील कामतघर, गणेशनगर परिसरात घडली असल्याचे समोर आले आहे. अभिषेक यादव (१२) असं बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.
भिवंडीतील गणेशनगर परिसरातील राहत्या घरातून अभिषेक यादव अचानक बेपत्ता झाला आहे. तो सहावीच्या वर्गात शिकत आहे. अचानक अभिषेक राहत्या घरातून निघून गेल्याने त्याच्या पालकांनी अभिषेकचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे अभिषेकच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे.