झोपाळ्याचा फास लागल्याने १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 19:06 IST2018-09-06T19:03:05+5:302018-09-06T19:06:33+5:30
आईच्या साडीपासून तयार करण्यात आलेल्या झोपाळ्याचा फास गळ्याभोवती आवळल्यामुळे १२ वर्षाच्या राकेश हरीलाल यादवचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

झोपाळ्याचा फास लागल्याने १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील बटरपाडा परिसरात एका १२ वर्षाच्या मुलाचा झोपाळ्याचा फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आईच्या साडीपासून तयार करण्यात आलेल्या झोपाळ्याचा फास गळ्याभोवती आवळल्यामुळे १२ वर्षाच्या राकेश हरीलाल यादवचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
काल संध्याकाळी ५.३० च्या सुमारास राकेश शाळेतून घरी परतला. राकेशच्या आईच्या जुन्या साडीचा झोपाळा खेळण्यासाठी बनवण्यात आला होता. घरी परतल्यावर तो झोपाळ्यावर खेळत होता. खेळता खेळता झोपाळ्याचा फास आवळला गेला, त्यातच राकेशचा जीव गेला. ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा घरी कोणीच नव्हते. राकेशला झोपाळ्याचा फास आवळला गेल्याचे शेजाऱ्यांना काही वेळाने लक्षात आले. त्यांनी तातडीने राकेशला हायवेजवळच्या रूग्णालयात नेलं. मात्र,तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.