शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पेशल २६’ स्टाईल छापा टाकणारे ११ तोतये अटकेत; ऐरोलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 15:57 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कांतिलाल यादव यांच्यासोबत हा प्रकार घडला होता.

नवी मुंबई : निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा छापा पडल्याचे भासवून ३४ लाख ८५ हजारांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन कार व लुटलेला २५ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कांतिलाल यादव यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. त्यांच्या ऐरोली येथील घरी २१ जुलैला अज्ञात सहाजणांनी ते लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगून छापा टाकला होता. त्यांनी यादव यांच्या घरातून तब्बल ३४ लाख ७५ हजारांचा ऐवज एकत्र करून लुटला होता. यादव यांना दोन दिवसांनी संशय आल्याने तिसऱ्या दिवशी त्यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली होती. गुन्हा दाखल होताच उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी निरीक्षक भागुजी औटी, सहायक निरीक्षक राकेश पगारे, दीपक खरात, उपनिरीक्षक दयानंद वणवे, हवालदार प्रसाद वायंगणकर, दर्शन कटके, टिकेकर, आदींचे पथक केले होते. त्यांनी परिसरातले सीसीटीव्ही तपासून संशयित कारची माहिती मिळवली होती. त्या आधारे पुणे, कल्याण, मुंबई परिसरातून शिताफीने अकरा जणांना अटक केली. दीपक कविटकर (४७), नरेश मिश्रा (५२), रूपेश नाईक (४२), सिद्धेश नाईक (३२), मुस्तफा करंकाळी (४०), विजय बारात (४३), देवेंद्र चाळके (३२), किशोर जाधव (४७), जुल्फिकार शेख (४३), वसीम मुकादम (३९) व आयुब खान (५०) अशी त्यांची नावे आहेत. अशा प्रकारे लुटमारीचा त्यांचा पहिलाच गुन्हा असून, काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलिसांना पाहिजे असलेल्या व्यक्तींनी तीन वेगवेगळ्या टोळ्यांच्या व्यक्तींना एकत्र करून कट रचला होता. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार व लुटीचा २५ लाखांचा ऐवज हस्तगत केल्याचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.

तीन महिन्यांपासून तयारी-    यादव यांच्या घरावर छापा टाकण्याची तीन महिन्यांपासून गुन्हेगारांची तयारी सुरू होती. -    एप्रिलमध्ये देखील त्यांनी छापा टाकण्याचा प्रयत्न केला असता काही कारणाने तो रद्द केला होता. त्यानंतर २१ जुलैला त्यांनी नियोजनाप्रमाणे छापा टाकला होता.

एकमेकांनाही अनोळखीअटक केलेले सर्वजण तीन वेगवेगळ्या गटातले असून, गुन्हा करताना ते घरात घुसले तेव्हाही ते परस्परांशी अनोळखी होते.टीप कोट्यवधींची, हाती लाखोयादव यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची अपसंपदा असल्याची टीप काही व्यक्तींना मिळाली होती. यावरून त्यांनी स्पेशल २६ प्रमाणे छापा टाकून लुटीचा बनाव रचला होता. प्रत्यक्षात मात्र ३४ लाख हाती लागल्याने त्यांचीही निराशा झाली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस