काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. ११ महिन्यांचे लेकरू घरात खेळत असताना पाण्याच्या बादलीत बुडाले आणि त्याच्या मृत्यू झाला. याचा आईला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यातून ती सावरलीच नाही. त्याच्या मृत्यूला मी जबाबदार आहे आणि या गोष्टीसह जगणं मला अवघड झालं आहे म्हणत आईनेही मृत्यूला कवटाळले.
पश्चिक बंगळुरुतील बायरावेश्वरनगरमध्ये ही घटना घडली. प्रतिभा वाली (वय २९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे, तर अगस्त्या वाली असे पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे.
अगस्त्याचा मृत्यू कसा झाला?
प्रतिभा वाली आयटी इंजिनिअर होती. ती एका कंपनी कामाला होती आणि तिचे काम वर्क फ्रॉम स्वरुपाचं होतं. तर तिचा ती महंतेश वाली हा ही आयटी इंजिनिअर असून, तो मात्र ही घटना घडली तेव्हा ऑफिसला गेलेला होता.
पोलिसांनी सांगितले की, प्रतिभा आणि अगस्त्या दोघेच घरात होते. अगस्त्याला घरात सोडून ती सायंकाळी सुकलेले कपडे आणायला छतावर गेली होती. त्याचवेळी ११ महिन्यांचा अगस्त्या खेळत खेळत बाथरुममध्ये गेला आणि पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूचा प्रतिभाला बसला धक्का
मुलाचा मृत्यू झाल्याने प्रतिभा दुखात बुडाली. माझ्यामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचे ती म्हणू लागली. तिने काही दिवसांपूर्वी गोळ्या घेऊन आणि हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्याने काहीच होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिने साडीने गळफास घेतला.
दरवाजा उघडताच पती हादरला
ही घटना संध्याकाळी उघडकीस आली. प्रतिभाचा पती महंतेश हा ६.३० वाजता घरी आला. त्यावेळी त्याने दरवाजा ठोठावला. घरातून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्याने प्रतिभाला कॉल केले. पण, ती कॉलही घेत नव्हती. मग महंतेशने त्याच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला.
घरातील दृश्य बघून तो हादरला. प्रतिभाचा मृतदेह साडीने पंख्याला लटकलेला होता, तर ११ महिन्याच्या अगस्त्याचा मृतदेह फरशीवर पडलेला होता. तिथेच बाजूला डोलो ६५० गोळ्यांचे रिकामे पाकिट पडलेले होते. तर प्रतिभाच्या मनगटावर धारदार शस्त्राने कापलेले होते.
याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. घरात पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली, जी प्रतिभाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली होती. त्यात म्हटले आहे की, अगस्त्याचा मृत्यू माझ्यामुळे झाला. त्याच्या मृत्यूला मी जबाबदार आहे आणि या अपराधासह मी जगू शकत नाही.
Web Summary : An 11-month-old baby drowned in a bucket, devastating his mother. Overwhelmed with guilt, the mother, an IT engineer, took her own life, leaving a note confessing her responsibility and inability to live with the tragedy in Bengaluru.
Web Summary : बेंगलुरु में 11 महीने के बच्चे की बाल्टी में डूबने से मौत हो गई, जिससे उसकी मां सदमे में आ गई। अपराधबोध से ग्रस्त मां ने आत्महत्या कर ली, और एक नोट छोड़ा जिसमें उसने अपनी जिम्मेदारी कबूल की और कहा कि वह इस त्रासदी के साथ नहीं जी सकती।