शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

लैंगिक अत्याचार करून विद्यार्थिनीला गरोदर करणाऱ्या शिक्षकाला १० वर्ष कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 16:59 IST

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी.बहालकर यांनी ही शिक्षा सुनावली

ठळक मुद्देसरकारी वकील म्हणून वर्षा चंदने यांनी काम पाहिले. ठाणे जिल्हा न्यायालयाने आज 10 वर्ष कारावास आणि 50 हजार रुपये दंड अशी सुनावली आहे. आरोपी हरिशंकर शुक्ला हा दिल्लीत असल्याचे त्याच्या मोबाइल ट्रेसिंगवरून निदर्शनास आले होते.

ठाणे - बहुचर्चीत नवी मुंबई येथील नेरूळमधील महात्मा गांधी मिशन (एमजीएम) शाळेत सातवीच्या विद्यार्थीनीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार करत तिला गरोदर करणारा शिक्षक राज उर्फ हरिशंकर अवध बिहारी शुक्ला याला ठाणे जिल्हा न्यायालयाने आज 10 वर्ष कारावास आणि 50 हजार रुपये दंड अशी सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी.बहालकर यांनी ही शिक्षा सुनावली असून सरकारी वकील म्हणून वर्षा चंदने यांनी काम पाहिले.

नेरुळच्या महात्मा गांधी मिशन (एमजीएम) शाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार करणारा फरार शिक्षक हरिशंकर शुक्ला याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती. डिसेंबर २०१६ साली आरोपी हरिशंकर शुक्ला हा दिल्लीत असल्याचे त्याच्या मोबाइल ट्रेसिंगवरून निदर्शनास आले होते. नेरुळच्या सेक्टर-८ मध्ये असलेल्या एमजीएम शाळेत इंग्रजी माध्यमात सातवी इयत्तेत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीवर या शाळेतील शिक्षक हरिशंकर शुक्ला याने बलात्कार केला. यातून ही मुलगी गर्भवती राहिली होती. मुलीच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. मात्र, मुख्याध्यापिका सविता गुलाटी यांनी कोणतीही दखल घेतली नाही. उलट मुलीच्या पालकांनाच दमदाटी केल्याचा आरोप पालकांनी केला होता. नेरुळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हरिशंकर शुक्ला हा सातवीच्या वर्गाला इंग्लिश शिकवत होता. एप्रिलमध्ये वर्गातील सर्व मुले पीटी तासासाठी वर्गाबाहेर गेले असताना या शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीला एकटीला थांबवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर या शिक्षकाने पीडित विद्यार्थीनीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले होते. घडलेला प्रकार मुलीने घरात न सांगितल्याने आरोपीने २०१६ साली ऑगस्टमध्ये पुन्हा पीडितेवर अत्याचार केले. सप्टेंबरमध्ये मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सुरुवातीला हा आरोप फेटाळणाऱ्या शुक्लानं गुन्हा दाखल होताच पळ काढला. त्याच्या कुटुंबानेही मग कोपरखैरणे येथील फ्लॅट सोडला. आरोपी हरिशंकर शुक्ला हा दिल्लीत असल्याचे त्याच्या मोबाइल ट्रेसिंगवरून निदर्शनास आले होते. नंतर नेरुळ पोलीस ठाण्याचे तसेच नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथकाने दिल्लीत त्याचा शोध घेतला आणि अटक केले. 

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPregnancyप्रेग्नंसीPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईSchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकRapeबलात्कारCourtन्यायालयthaneठाणे