शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

पॉक्सोअंतर्गत बलात्कारी पोलीसाला १० वर्ष कारावासाची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 19:31 IST

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेले निर्जनस्थळी आणि केला होते लैंगिक शोषण 

 

गडचिरोली -  एका ११ वर्षीय शाळकरी मुलीला मोटरसायकलवरून शाळेत सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पोलीस हवालदाराला १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.जी.मेहरे यांनी आज ठोठावली. प्रमोद देवाजी चापले असे आरोपीचे नाव आहे.गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथील रहिवासी असलेला तत्कालीन पोलीस हवालदार प्रमोद चापले २०१५ मध्ये सिरोंचा पोलीस ठाण्यात कार्यरत होता. पीडित मुलीच्या घरी तो नेहमी जात असे. अशातच ३१ मार्च २०१५ रोजी सकाळी त्याने त्या घरातील ११ वर्षीय शाळकरी मुलीला शाळेत सोडून देण्याच्या बहाण्याने आपल्या मोटार सायकलवरून सिरोंचा ते आलापल्ली मार्गावरील सूर्यापल्ली गावाजवळील पुलाखाली नेले आणि तिच्याशी जबरदस्ती केली. यावेळी त्याने त्या बालिकेशी अनैसर्गिक कृत्यही केले. या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास गाडीखाली चिरडून टाकील आणि वडिलांना बंदुकीची गोळी घालून ठार मारेल अशी धमकी त्याने पीडित मुलीला दिली. हा प्रकार उघड झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सिरोंचा ठाण्यात प्रमोद चापलेविरूद्ध भा. दं. वि. कलम ३७६, ३७७, ५०६ तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार (पॉक्सो) आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. एसडीपीओ डॉ.शिवाजी पवार यांनी प्रकरणाचा तपास केला.या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे १२ साक्षदारांचे जबाब नोंदविण्यात आले. तसेच पीडित मुलीचे बयाण, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेऊन सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून विविध कलमान्वये जास्तीत जास्त १० वर्ष सश्रम कारावास आणि एकूण ३५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक शरद मेश्राम यांनी काम पाहिले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदाsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस