१० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने डोकं ठेचले अन् जिवंत गाडण्याची केला प्रयत्न  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 02:45 PM2020-02-05T14:45:35+5:302020-02-05T14:49:46+5:30

जेव्हा तिला शोधण्यात आले तेव्हा तिला अर्धवट जमिनीवर पुरण्यात आल्याचे दिसून आले.

10-year-old girl raped and stabbed to head and tried to buried her alive | १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने डोकं ठेचले अन् जिवंत गाडण्याची केला प्रयत्न  

१० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने डोकं ठेचले अन् जिवंत गाडण्याची केला प्रयत्न  

Next
ठळक मुद्दे २१ वर्षीय बेरोजगार युवकाने पीडित मुलीवर बलात्कार करून तिच्या डोक्यावर दगड घालून ठेवण्याचा प्रयत्न केला. पीडित १० वर्षीय मुलगी रुग्णालयात जीवन-मृत्यूच्या लढाईचा सामना करत आहे. मात्र, तिची प्रकृती थोडी स्थिर आहे.

चूरू - राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात १० वर्षांच्या मुलीसह हृदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. तिसर्‍या इयत्तेत शिकत असलेला पीडित विद्यार्थिनी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय बेरोजगार युवकाने पीडित मुलीवर बलात्कार करून तिच्या डोक्यावर दगड घालून ठेवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही पीडित मुलीला जवळजवळ अर्धे जिवंत पुरले होते, जेव्हा तिला शोधण्यात आले तेव्हा तिला अर्धवट जमिनीवर पुरण्यात आल्याचे दिसून आले.

मद्य पाजून विवाहित महिलेवर रात्रभर अत्याचार


पीडित १० वर्षीय मुलगी रुग्णालयात जीवन-मृत्यूच्या लढाईचा सामना करत आहे. मात्र, तिची प्रकृती थोडी स्थिर आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पीडितेच्या शेजारी राहत होता. बलात्कारानंतर आरोपीने तिला सुनसान घरात जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला होता. तिसर्‍या इयत्तेत शिकणारी मुलगी रात्री 9.30 च्या सुमारास जवळच्या दुकानातून चॉकलेट खरेदी करायला गेली होती. जेव्हा ती बराच वेळ झाला घरी परतली नाही त्यावेळी कुटुंबीयांनी तिला शोधायला सुरुवात केली. नंतर मुलगी एका सुनसान घरात बेशुद्ध अवस्थेत सापडली आणि डोक्यातून खूप रक्तस्त्राव होत होता. तसेच मानेवर देखील जखमांच्या खुणा होत्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पीडित मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

हृदयद्रावक! नात्याला काळीमा; खुनातील आरोपी मामाकडून भाचीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या

Web Title: 10-year-old girl raped and stabbed to head and tried to buried her alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.